Advertisement

नाल्याच्या पाहणीसाठी पहारेकरी सज्ज

भाजपाचे नगरसेवक नालेसफाईच्यात कामावर लक्ष ठेऊन असून भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी विणा नगर, जे. जे. अॅकडमी, या मुलुंड, भांडून परिसरातील कामाची पाहणी केली. वडाळा विभागातील नगरसेविका नेहल शहा यांनी बंगालीपूरा नाल्याची पाहणी केली. फ्रान्सीस नगर, बांद्रेकर वाडी या जोगेश्वखरीतील नाल्यांची पाहणी नगरसेवक पंकज यादव यांनी केली. तर नगरसेवक जितेंद्र पटेल यांनी चंदावकर नाल्याची पाहणी केली. भाजपाचे नगरसेवक नाल्यांत उतरून या कामाची पाहणी करत असल्याची माहिती, शेलार यांनी दिली.

नाल्याच्या पाहणीसाठी पहारेकरी सज्ज
SHARES

मुंबईतील नालेसफाईबाबत भाजपा यंदा अधिक आक्रमक झाली असून सर्व नाल्यांची सफाई झाली की नाही हे पाहण्यासाठी पारदर्शक कारभाराची मागणी करणारे पहारेकरी सज्ज झाले आहेत. भाजपाचे नगरसेवक मुंबईतील सर्व नालेसफाईच्या कामांची पाहणी करत असून वजनात पारदर्शकता नसल्याची खंत त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा, शिवसेनेला नालेसफाईवरून काट्यावर घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

'या' नाल्यांची केली पाहणी

मुंबईचे भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार शहरातील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत आहेत. बुधवारी यासंदर्भातील बैठक घेतल्यानंतर शेलार यांनी शुक्रवारी सकाळी नॉर्थ एव्हेन्यू, मेन एव्हेन्यू साऊथ इव्ह्युलनी, एसएनडीटी नाला, आर. के. मिशन नाला सह खार, सांताक्रूझ, वांद्रे आणि गझधरबंद परिसरातील नाल्यांची पाहणी केली.

कुणाचा समावेश?

भाजपाचे नगरसेवक नालेसफाईच्यात कामावर लक्ष ठेऊन असून भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी विणा नगर, जे. जे. अॅकडमी, या मुलुंड, भांडून परिसरातील कामाची पाहणी केली. वडाळा विभागातील नगरसेविका नेहल शहा यांनी बंगालीपूरा नाल्याची पाहणी केली. फ्रान्सीस नगर, बांद्रेकर वाडी या जोगेश्वखरीतील नाल्यांची पाहणी नगरसेवक पंकज यादव यांनी केली. तर नगरसेवक जितेंद्र पटेल यांनी चंदावकर नाल्याची पाहणी केली. भाजपाचे नगरसेवक नाल्यांत उतरून या कामाची पाहणी करत असल्याची माहिती, शेलार यांनी दिली.

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका

यावेळी पत्रकारांशी बोलताना शेलार यांनी, स्थायी समितीमध्ये आमचे सदस्य बोलत आहेत. त्यामुळे हा सावधानतेचा इशारा असल्याचं सांगितलं. गझधर बंद पम्पिंग स्टेशन सुरू झालेलं नाही. त्याामुळे जूहू, सांताक्रूझ, अंधेरी, खार या परिसरातील पाण्याचा निचरा कसा होणार यांत स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे हे पम्पिंग स्टेशन तातडीने सुरू करा. जो कंत्राटदार काम करीत नाही, त्याला तातडीने काळ्या यादीत टाकून नवीन कंत्राटदार नियुक्त करावा, अशी मागणी शेलार यांनी केली.

पारदर्शकता नाहीच

या प्रक्रियेला दिरंगाई होणार असेल, तर ज्या ठिकाणी मातीचे बंधारे उभारण्यात आले आहेत ते त्वरीत काढून पाण्याचा निचरा झपाट्याने होईल याकडे लक्ष देण्यात यावं, अशीही मागणी केली. तसंच वजन काट्याबाबतचा प्रश्न मागील वेळेस आम्ही उपस्थित केला होता तो आजही उपस्थित करीत असल्याचं सांगत, आजही वजनात पारदर्शकता नसल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा-

पालिकेचा अजब न्याय! कंत्राटदाराला दिला ४५ लाखांचा बोनस!

आयुक्तांची भ्रष्टाचार विरोधातील लढाई कुठपर्यंत? स्थायी समितीचा सवाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा