Advertisement

मुंबईतील सर्व मॉलमधील अग्निशमन यंत्रणांची तपासणी

मॉलमधील अग्नितांडवानंतर मुंबईतील सर्व मॉलमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील सर्व मॉलमधील अग्निशमन यंत्रणांची तपासणी
SHARES

मुंबईतील मुंबई सेंट्रल (mumbai central) येथील नागपाडा परिसरात असलेल्या सिटी सेंटर मॉलला (city center mall) आगा लागली होती. तब्बल ५६ तासांनी ही आग (fire) नियंत्रणात आली. पंरतू, या आगीवर मिळविण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे ४ जवान जखमी झाले. त्यामुळं मॉलमधील अग्नितांडवानंतर मुंबईतील सर्व मॉलमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच त्याबाबतचे आदेश अग्निशमन दलाच्या (fire brigade) केंद्रांना देण्यात येणार आहेत.

सिटी सेंटर मॉलला मागील आठवड्यात भीषण आग लागली होती. या मॉलमध्ये मोबाइल (mobile) आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्सच्या (electronics) वस्तूंची मोठ्या प्रमाणावर दुकानं होती. तसंच मॉलमधील अंतर्गत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळं अग्निशमनात अनेक अडथळे निर्माण झाले होते. मागील गुरुवारी रात्री लागलेल्या आगीनं काही तासांतच अक्राळविक्राळ रूप घेतलं.

अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा मॉलला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमुळं आग धुमसत होती. सतत भडकणारी आग आणि पसरणारा धूर यांमुळं अग्निशमनात अनेक अडथळे निर्माण होत होते. तब्बल ३९ तासांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या घटनेची अग्निशमन दलाने गंभीर दखल घेतली आहे.

सिटी सेंटर मॉलमधील अग्निशमन यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित झाली नाही. ही यंत्रणा कार्यान्वित असती तर वेळीच आगीवर नियंत्रण मिळविता आले असते. मात्र अशी घटना भविष्यात इतर ठिकाणी घडू नये यासाठी मुंबईतील सर्वच मॉलमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच अग्निशमन दलाच्या सर्व केंद्रांना सूचना देण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

सर्वांसाठी सुरु होणार मुंबई लोकल?

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा