Advertisement

मुंबईच्या चौपाट्यांवरील लाईफगार्डची संख्या वाढणार

मुंबई महापालिकेने समुद्र किनाऱ्यांवर आणखी लाईफगार्ड तैनात करण्याच्या निर्णय घेतला आहे. हे लाईफगार्ड खासगी एजन्सीकडून भाडेतत्वावर घेण्यात येतील.

मुंबईच्या चौपाट्यांवरील लाईफगार्डची संख्या वाढणार
SHARES

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरील सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने किनाऱ्यांवर आणखी लाईफगार्ड तैनात करण्याच्या निर्णय घेतला आहे. हे लाईफगार्ड खासगी एजन्सीकडून भाडेतत्वावर घेण्यात येतील. सध्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरील लाईफगार्डची संख्या ३६ असून महापालिका आणि अग्निशमन दल ही संख्या ९३ वर नेण्याच्या तयारीत आहे.


कुठल्या समुद्रकिनाऱ्यांवर?

मुंबई अग्निशमन दलाने खासगी एजन्सीकडून ८१ अतिरिक्त लाइफगार्ड भाडेतत्वावर घेण्याच्या निविदा काढल्या आहेत. या अतिरिक्त लाइफगार्ड्सना गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा-मनोरी आणि गोरई या समुद्र चौपाट्यांवर ३ वर्षांसाठी तैनात करण्यात येणार आहे.


१० कोटींचा खर्च

अतिरिक्त लाईफगार्डची तैनाती करण्यासाठी १० कोटी रुपये खर्च येणार आहे. कार्यआदेश दिल्यानंतर शहरातील समुद्र किनाऱ्यांवर लाइफगार्ड तैनात करण्यासाठी ६० दिवसांचा अवधी दिला जाणार आहे.



हेही वाचा-

महापालिका शाळांत कुपोषणमुक्तीचा फाॅर्म्युला कुठला? 'प्रजा'चा महापालिकेला सवाल

धारावी पुनर्विकासासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निविदा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा