Advertisement

फेरीवाल्यांविरोधात रेल्वे पोलीस, महापालिकेची संयुक्त कारवाई


फेरीवाल्यांविरोधात रेल्वे पोलीस, महापालिकेची संयुक्त कारवाई
SHARES

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाईच्या मागणीवरून मुंबईत मनसेने रान उठवल्यानंतर सोमवारी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डिआरएम) यांच्यासोबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या बैठकीमध्ये रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दीतील फेरीवाल्यांवर एकाचवेळी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विशिष्ट रंगाचे पट्टे मारुन दोघांचीही हद्द निश्चित करण्यात येणार असल्याचेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.


हद्द निश्चित करण्याचा निर्णय

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत हद्दीबाबतचा वाद असून रेल्वे, महापालिका आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे ही कारवाई प्रभावीपणे केली जात आहे. त्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त यांची सोमवारी भेट घेतल्यानंतर मंगळवारी दुपारी १२.३० वाजता ते पश्चिम व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहे. परंतु तत्पूर्वीच दोन्ही रेल्वेच्या डिआरएमसोबत महापालिका अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी दुपारी पार पडली.

रेल्वेच्या डिआरएमसोबत पार पडलेल्या या बैठकीत रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दी निश्चित करण्याचा निर्णय झाला असून त्याप्रमाणे दोन्ही प्रशासन एकाचवेळी फेरीवाल्यांवरील कारवाई हाती घेतील, असेही निश्चित करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याबरोबरच झालेल्या बैठकीत रेल्वे प्रशासनासोबत झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी दिली. यामध्ये त्यांनी हद्दीचा वाद सोडवण्यासाठी सीमा निश्चित करणे तसेच एकाच वेळी रेल्वे आणि महापालिकेची कारवाई केली जाईल, असे सांगितले. जेणेकरून महापालिकेची कारवाई सुरु झाल्यानंतर फेरीवाला रेल्वेच्या हद्दीत शिरणार नाही आणि रेल्वेची कारवाई सुरु असताना महापालिकेच्या हद्दीत येणार नाही, असे आयुक्तांनी सांगितल्याचे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.


साप समजून भुईला थोपटू नये

मुंबईतील फेरीवाल्यांवर सुरु असलेली फेरीवाल्यांवरील कारवाई ही सरसकट सर्वाँवरच व्हायला हवी. ती नावाला किंवा दाखवण्यासाठी केली जावू नये. साप समजून भुईला थोपटण्यासारखी ही कारवाई नसावी, अशा शब्दांत सभागृहनेते यशवंत जाधव यांनी महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या कारवाईचा समाचार घेतला.



हेही वाचा - 

डबल स्ट्राईक, फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडात दुपटीने वाढ

तर, फेरीवाले आपली स्टाईल दाखवतील - शशांक राव


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा