Advertisement

दादरमधील फेरीवाल्यांवरील कारवाईत रेल्वे पोलीस चुस्त, महापालिका सुस्त


दादरमधील फेरीवाल्यांवरील कारवाईत रेल्वे पोलीस चुस्त, महापालिका सुस्त
SHARES

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मनसेने १५ दिवसांचा अल्टीमेटम दिल्यानंतर रेल्वे आणि महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. एका बाजूला दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील फेरीवाल्यांवर रेल्वेकडून कडक कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे स्थानकालाच लागून असलेल्या केशवसूत उड्डाणपूल आणि आसपासच्या गल्ल्यांमध्ये फेरीवाले पोलीस आणि महापालिकेच्या गाड्या असतानाही बिनधास्त बसलेले आहेत. हे चित्र पाहता रेल्वे पोलिसांकडून कडक कारवाई सुरु असताना महापालिकेचे अधिकारी मात्र सुस्त बसलेले दिसत आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील दुघर्टनेचा निषेध करण्यासाठी मनसेने काढलेल्या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानकाच्या पुलावरील तसेच स्थानकाशेजारील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केली. हा मोर्चा झाल्यापासून दादर पश्चिम रेल्वे स्थानकाशेजारी एकाही फेरीवाल्यांना बसू दिले जात नाही. सकाळपासून रेल्वे पोलिसांकडून कारवाई सुरू होते.



'इथे' आहेत फेरीवाले

मात्र, महापालिकेच्या कारवाईत कोणताही दम दिसून येत नाही. दादर रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील पूर्व व पश्चिम दिशेला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या खालील फेरीवाले वगळले तर पुढील सर्व भागांमध्ये फेरीवाले बसलेले आहेत. दादर स्थानकाच्या समोरील केशवसूत उड्डाणपूलाच्या खाली फेरीवाले बसलेले पाहायला मिळत आहेत. याशिवाय रानडे मार्ग, डिसिल्वा मार्ग(दरबार गल्ली), जावळे मार्ग (कबुतरखाना गल्ली) आदी ठिकाणीही फेरीवाले पथारी पसरुन धंदा करताना दिसत आहेत.


सोशल मीडियावरील फोटो फसवे

मनसेच्या एका इशाऱ्यानंतर दादर फेरीवालामुक्त झाल्याचे फोटाे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. शिवाय प्रसार माध्यमेही फेरीवालामुक्त दादरच्या बातम्या दाखवू लागले आहेत. प्रत्यक्षात मात्र दादर रेल्वे स्थानकाच्या शेजारील कारवाई वगळता कोणत्याही फेरीवाल्यांवर कारवाई होत नसून सर्वच फेरीवाले नेहमीप्रमाणे धंदा करताना दिसत आहेत.



जरा स्वत: येऊन पहा

शनिवारी संध्याकाळी हे फेरीवाले पदपथ आणि रस्त्यांवर बसलेले होते. यामुळे स्थानकातून गर्दीविना बाहेर पडलेल्या प्रवाशांना पुलाच्या खाली फेरीवाल्यांमुळे झालेली गर्दी चुकवून पुढे सरकावे लागत होते. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दादर फेरीवालामुक्त झाला आहे का? हे स्वत: अचानक भेट देवून पाहा, अशी चर्चा प्रवासी करत आहेत.



४ दिवसांचे नाटक

दादर पूर्व व पश्चिम पादचारी पुलावर प्रसारमाध्यमाच्या छायाचित्रकाराला धक्काबुक्की झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्वत: भेट देऊन दादरमधील फेरीवाल्यांवर कारवाई करून प्रवाशांना चालण्यास रस्ता मोकळा करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी दादरमधील सर्व फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. पदपथांवर फेरीवाले बसू नये म्हणून मोठ्या आकाराच्या झाडाच्या कुंड्याही ठेवल्या होत्या. परंतु अवघ्या महिन्याभरातच ही कारवाई थंड झाली आणि तेथे पुन्हा फेरीवाले बसून लागले. त्यामुळे ही कारवाई चार दिवसांचे नाटक असून केवळ पोलिस, महापालिकेचे अधिकारी यांचे हप्ते वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा फेरीवाल्यांमधून ऐकायला मिळत आहे.



हेही वाचा -

फेरीवाल्यांचं काय होणार माहिती आहे?

दादर टिळक ब्रिजवरच्या भिंती म्हणतात 'अआइई', 'ABCD'!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा