दादर टिळक ब्रिजवरच्या भिंती म्हणतात 'अआइई', 'ABCD'!


  • दादर टिळक ब्रिजवरच्या भिंती म्हणतात 'अआइई', 'ABCD'!
SHARE

दादरचा टिळक पूल, अगदी कोणालाही माहीत असलेले हे ठिकाण. दादर स्टेशनला लागून असलेल्या या पुलावर लोकांची नेहमीच गर्दी असते. अनेकदा येथे फेरीवालेही बसलेले दिसतात. डोक्यावर छप्पर नसलेल्या अनेकांनी याच पुलावर आपला संसार थाटला आहे. रस्त्यावर हलाखीचे जीवन जगत असलेल्या या लोकांच्या मुलांनी शाळा तर कधी बघितलीच नाही. अशाच मुलांसाठी तिथल्या भिंती जणू फळा बनल्या आहेत. ते कसे या विचारात तुम्ही नक्कीच पडला असाल. 

दादर येथील टिळक ब्रिजवर असलेल्या भिंतींवर अ आ इ ई आणि A B C D संपूर्ण Z पर्यंत रंगाने लिहल्या आहेत. हे कार्य पिरामल फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केले आहे.दान उत्सव उपक्रमासाठी पुढाकार

2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा जयंती सप्ताह 'दान उत्सव' म्हणून दरवर्षी पाळण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही 8 ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव मुंबईत साजरा केला जात आहे. 2008 मध्ये स्थापन झालेली पिरामल फाऊंडेशनने दान उत्सव या उपक्रमांतर्गत शनिवारी दादरच्या टिळक पुलावर राहणाऱ्या मुलांसाठी या भिंतींवर अ आ इ ई रंगांने लिहल्या आहेत. सोबतच अंकलिपीमध्ये आपण अ म्हणजे अननस, आ म्हणजे आई वाचतो त्याचप्रमाणे या भिंतीवर देखील तसेच चित्र काढण्यात आले आहे.  


दान उत्सवानित्ताने पिरामिल ही संस्था 2 ऑक्टोबरपासून मुंबई शहरातील भिंती सुशोभित करण्याचे काम करत आहे. या दान उत्सवात अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. दादर, चर्चगेट, अंधेरी, घाटकोपरसह मुंबईतल्या विविध ठिकाणी भिंती सुशोभित केल्या जात आहेत. यावेळी ओपन स्कूल, स्वच्छ भारत, ट्रॅफिक रूल्स, खेळाचे महत्त्व असे महत्त्वाचे विषय हाताळले जात आहेत. याचसोबत समुद्र किनारे स्वच्छ करण्याचे काम देखील ही संस्था करत आहे.


हेही वाचा - 

सिग्नल शाळा...इथे उद्याचा भारत घडतो!

देशातल्या पहिल्या सिग्नल शाळेचा निकाल पहिल्याच वर्षी ९९ टक्के!


संबंधित विषय
ताज्या बातम्या