Advertisement

हे काय? कचऱ्यात डेब्रिज मिसळणाऱ्या दोषी कंत्राटदाराला पुन्हा कंत्राट


हे काय? कचऱ्यात डेब्रिज मिसळणाऱ्या दोषी कंत्राटदाराला पुन्हा कंत्राट
SHARES

कचऱ्याच्या गाड्यांमध्ये डेब्रिज मिसळणाऱ्या दहा कंत्राटदारांविरोधात महापालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असतानाच आता यापैकी एका दोषी कंत्राटदारांलाच पुन्हा कंत्राट देण्याचा घाट घातला आहे. गोराई कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचे कंत्राट संपुष्ठात आल्यानंतर महापालिकेने याचे कंत्राट कविराज-एम. बी. व्ही. टी वेस्ट (जेव्ही) यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

गोराई डम्पिंग ग्राऊंड २००८ बंद करण्यात आल्यानंतर या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम बंद करण्यात आले. त्यामुळे गोरेगाव, मालाडपासून दहिसरपर्यंतचा कचरा गोराई येथील कचरा हस्तांतरण केंद्रात जमा करून तिथून देवनार, कांजूर आदी ठिकाणी टाकला जातो.


दोषी कंपनीलाच पुन्हा दिले कंत्राट

गोराई कचरा हस्तांतरण केंद्रातून दरदिवशी ३०० मेट्रीक टन कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. त्यामुळे येथून कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराची मुदत ४ सप्टेंबर २०१७ रोजी संपुष्ठात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून यामध्ये कविराज-एमबीव्हीटी वेस्ट या जेव्ही कंपनीला कंत्राट दिले आहे.

कविराज या कंपनीला ७.९६ कोटी रुपयांचे दोन वर्षांचे कंत्राट दिले जात आहे. या कंत्राटाला स्थायी समितीची अद्यापही मान्यता मिळालेली नसून त्याआधी ५४ दिवसांचे कंत्राट दिले आहे. यासाठी या कंपनीला सुमारे ५० लाखांचे कंत्राट दिले आहे. विशेष म्हणजे ज्या कविराज कंपनीला पुन्हा कंत्राट दिले जात आहे, ती कंपनी कचऱ्यात डेब्रिज मिसळणाऱ्या दहा कंत्राटदारांपैकी एक आहे. कचऱ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी कंत्राटदारांपैकी एक असलेल्या याच कंपनीला पुन्हा हे कंत्राट देण्याचा घाट घातला जात आहे.



हेही वाचा - 

रस्त्यावर कचऱ्याचा ढिग अन् म्हणे कचरापेटीमुक्त मुंबई


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा