• बायोमेट्रिक हजेरी प्रकरण - रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा लवकरच होणार पगार!
SHARE

बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करावी, या मागणीसाठी केईएम रुग्णालयातील कर्मचारी, नर्स आणि कामगारांनी केलेल्या आंदोलनापुढे अखेर महापालिका प्रशासन नमलं आहे. शुक्रवारपासून ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पगार जमाच झाले नाहीत, त्यांचे पगार होणार आहेत. गुरूवारी झालेल्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये पगार होणार असल्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.


१७ हजार कर्मचाऱ्यांचे पगार होणार

दरम्यान, शुक्रवारपासून ज्यांच्या खात्यामध्ये काहीच पगार जमा झालेला नाही, अशाच कर्मचाऱ्यांचे पगार होणार आहेत. अशा कर्मचाऱ्यांची संख्या १७ हजार आहे. मात्र, ज्यांचे पगार लेट मार्क, सुट्टी किंवा अशा कारणांमुळे कापले गेले आहेत, त्यांची रीतसर चौकशी करून मगच पुढील कार्यवाही होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


बायोमेट्रिकविरोधात जोरदार आंदोलन

महापालिका प्रशासनाने लागू केलेल्या बायोमेट्रिक हजेरीच्या गोंधळामुळे पालिकेतील कामगार,
कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्या वेतनात फार मोठी कपात करण्यात आली. बायोमेट्रिक हजेरी पद्धतीच्या विरोधात केईएम रुग्णालयात बुधवारी आंदोलन करण्यात आलं. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी या आंदोलनात महापालिकेच्या नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला होता.अनेकांचे लेटमार्क, हजेरीच गायब!

बायोमेट्रिक हजेरीमुळे अनेक पालिका कर्मचाऱ्यांचे लेटमार्क लागले. काही कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद देखील झाली नाही. बायोमेट्रिक हजेरी ही थेट पगाराशी जोडण्यात आल्यामुळे अनेकांचे पगार कापण्यात आले. पण, केईएम आणि नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे आदेश दिले आहेत.


आमचा विजय झाला आहे. आमचा मोर्चा संपला आहे. उद्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार होणार आहेत. त्यामुळे आम्ही महापालिका प्रशासनाचे आभारी आहोत.

सुनील चिटणीस, कार्याध्यक्ष, शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कामगार सेना

पगार कपातीविरोधात कर्मचाऱ्यांचा मोर्चा

बायोमेट्रिक हजेरी पद्धतीविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आपलं आंदोलन अधिक तीव्र केलं होतं. प्रशासनाविरोधात एल्गार पुकारत कर्मचाऱ्यांनी पगार कपातीच्या मुद्यावर रुग्णालय परिसरात मोर्चा काढला. परळच्या केईएम रुग्णालयासह नायर रुग्णालयातही पगाराच्या मुद्द्यावर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली होती.


तांत्रिक बिघाडामुळे लागली गैरहजेरी?

कर्मचाऱ्यांचा आरोप होता की बायोमेट्रिक मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे अनेक कर्मचाऱ्यांना गैरहजर दाखवून त्यांचा पगार कापला गेला. सध्या रुग्णालयात १ हजार परिचारिका, अन्य कामगार आणि डॉक्टर मिळून १४ हजार कर्मचारी काम करत आहेत. पण, त्यांच्यासाठी या मशिन कमी पडतात. त्यामुळे वेळेवर पोहोचलो तरी आधीच हजेरीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, अशी तक्रार काही परिचारीकांनी केली आहे.हेही वाचा

कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक्सनं, मग नगरसेवकांची कधी?


संबंधित विषय
ताज्या बातम्या