Advertisement

बापरे! महापालिका सहआयुक्त पाणी समजून प्यायले सॅनिटायझर

देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. हा

बापरे! महापालिका सहआयुक्त पाणी समजून प्यायले सॅनिटायझर
SHARES

देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प सादर करतेवेळी एक मोठी घटना घडली. पालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायले. सोशल मीडियावर या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

कोरोना महामारीच्या संकटानंतर हा अर्थसंकल्प सादर होत आहे. दुपारी १२ वाजता सुरू होणारा अर्थसंकल्प १५ मिनिटं सभागृहात उशीरा सुरू झाला. यामुळे सभागृहात वृत्त वाहिन्यांते कॅमेरे देखील सरसावले. नंतर शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सहआयुक्त रमेश पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर मान्यवर मंडळी स्थानापन्न झाले. सवयी प्रमाणे सहआयुक्तांनी समोर ठेवलेल्या बाटलीतील पाण्याचा घोट घेतला आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की, ते पाणी नसून आपण सॅनिटायझरचा घोट घेतला आहे.

हेही वाचा - महापालिकेच्या शाळा होणार आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’

हा प्रकार पवार यांच्या मागे उभा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी पवारांना अडवलं. त्यानंतर पवारांनी पाण्याचा घोट घेतला आणि त्वरीत सभागृहाबाहेर जाऊन चूळ भरून काही न झाल्याचं दर्शवत पुन्हा आपल्या जागी येऊन बसले. मात्र, हा क्षण सभागृहातील वृत्त वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांनी कैद केला आणि नेहमी प्रमाणं हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घालू लागला आहे. 



हेही वाचा -

महापालिकेच्या शाळा होणार आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’

BMC Budget 2021-22: आणखी २४ शाळांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण मिळणार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा