Advertisement

BMC Budget 2021-22 : महापालिका डिजिटल शिक्षणावर देणार भर

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा २९४५.७८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सह आयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला.

BMC Budget 2021-22 : महापालिका डिजिटल शिक्षणावर देणार भर
SHARES

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा २९४५.७८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सह आयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला. या अर्थसंकल्पात पालिका शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, विज्ञान कुतूहल भवनाची निर्मिती, विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ प्रकारच्या विविध शालेय उपयोगी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ७८.८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

१० नवीन सीबीएससी बोर्डाच्या शाळांसाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. धोकादायक शालेय इमारतींची दुरुस्ती करणं, मुख्याध्यापक अधिकाराचं विकेंद्रीकरण, माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आदी बाबींसाठी निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पात नवीन बाबी अथवा योजनांचा विषेश उल्लेख नाही. गतवर्षीचा अर्थसंकल्प २९४४.५९कोटी रुपयांचा आणि १०२.१३ कोटी रुपये शिलकीचा होता. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प हा १.१९ कोटी रुपयांनी जास्त आहे.

या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न २७०१.७७ कोटी रुपये तर महसुली खर्च २००१.७७ कोटी इतकाच दर्शवला आहे. भांडवली प्राप्ती २४४.०१ कोटी रुपये तर भांडवली खर्चही २४४.०१ कोटी रुपये दाखविण्यात आला आहे. अशा प्रकारे शिक्षण खात्याच्या उत्पन्नात २९४५.७८ कोटी रुपये आणि खर्चही तितकाच म्हणजे २९४५.७८ कोटी रुपये दाखविण्यात आल्याने ह्या अर्थसंकल्पात शिल्लक काहीच दाखविण्यात आलेली नाही.



हेही वाचा - 

BMC Budget 2021-22 : मुंबई महापालिका शाळांचं नाव बदलणार

कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न सहाव्यांदा यशस्वी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा