Advertisement

मुंबई महापालिकेचा 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार

मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

मुंबई महापालिकेचा 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार
SHARES

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा (BMC) 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प (BMC Budget) शनिवारी, चार फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा बजेट प्रशासकाकडून सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल अर्थसंकल्प मांडणार आहेत.

पालिका अर्थसंकल्प सादर करण्याआधी मुंबई महापालिका आयुक्त यांना मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिका अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभिकरण यांचा अंतर्भाव करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

पालिकेकडून अर्थसंकल्प सादर करत असताना मिळालेल्या नागरिकांचे, राजकीय पक्षांचे अभिप्राय आणि सूचना लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

प्रशासक म्हणून आयुक्तांकडून यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पूर्ण वेळ घेऊन यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

मुंबई महापालिका प्रशासक मांडणार अर्थसंकल्प, मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी काय पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदा सन 2023- 24चा अर्थसंकल्प4 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचे प्रशासक व आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल मांडणार आहेत. आयुक्त हेच या अर्थसंकल्पाला मंजुरी देणार आहेत. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकच अर्थसंकल्प मंजूर करण्यात येणार आहे.



हेही वाचा

वांद्रेतील 'या' मार्गावरील वाहतूक १७ फेब्रुवारीपर्यंत वळवली

Union Budget 2023: काय स्वस्त? काय महाग? जाणून घ्या एका क्लिकवर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा