Advertisement

रात्री दहानंतर होणाऱ्या बांधकाम बंदीबाबत पुनर्विचार होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत यासंदर्भात बैठक झाली.

रात्री दहानंतर  होणाऱ्या बांधकाम बंदीबाबत पुनर्विचार होणार
(File Image)
SHARES

मुंबई पोलिसांनी रात्री १० नंतर बांधकामांवर बंदी घातली आहे. पण या बंदीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुद्दा उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत यासंदर्भात बैठक झाली. या बैठकित पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी रात्री १० नंतर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याची विनंती करण्यात आली. कारण त्यामुळे साइटवरील कचरा विल्हेवाटीवर परिणाम होत आहे.

या बंदीचा डेब्रिजच्या विल्हेवाटीवर वाईट परिणाम होत असून पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

पावसाळ्यापूर्वी नाल्यांचे गाळ काढण्याचे काम पूर्ण होईपर्यंत ३१ मे पर्यंत हा आदेश स्थगित ठेवण्याचे आदेश मुंबई पोलिस प्रमुख संजय पांडे यांना देण्यात आले आहेत.

बैठकीत ठाकरे यांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावाही घेतला. ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी), मुंबई मेट्रो, एमएमआरडीए आणि म्हाडा यासारख्या एजन्सींच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.

सीएमओनं जारी केलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की, ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना चालू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

कांदिवलीत सुरू असलेली मेट्रोची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि खड्डे वेळेत बुजवावेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठीही अधिकाऱ्यांना पावले उचलण्यास सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा

डेब्रिज, नालेसफाई कामं ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

कोरोना काळात आकारण्यात आलेला दंड परत करण्यासाठी जनहित याचिका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा