SHARE

प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेची सर्व कार्यालये प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे. यासाठी पुढील २१ दिवसांत प्लास्टिक बॉटल्ससह सर्वच प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.


बंदीनंतरही प्लास्टिक बॉटल्सचा वापर

सरसकट सर्वच प्लास्टिक बंदीचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय कार्यलये आणि सर्व महापालिका कार्यालये यामध्ये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही महापालिका कार्यलयांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्सचा वापर सुरू आहे.


२१ दिवसांत बाटल्या बंद!

आयुक्तांनी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्या यांची विल्हेवाट पुढील २१ दिवसांत लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


काचेच्या ग्लासमध्ये मिळणार पाणी

प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याने, प्रत्येक विभागाच्या कार्यलयात बसवण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण तसेच थंड पाण्याच्या यंत्रांची पाहणी करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. यापुढे प्रत्येक खाते आणि विभागाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या बैठकांना प्लास्टिक बॉटल्स बंद करून पेपर ग्लासच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून द्यावं, असंही म्हटलं आहे.


१० वर्षांनंतर पुन्हा काचेचे ग्लास!

महापालिकेच्या स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती, तसेच प्रभाग समिती आणि इतर विशेष समित्यांच्या बैठकांमध्ये दहा वर्षांपूर्वी काचेच्या ग्लासातून सदस्यांना पाणी दिले जायचे. परंतु काचेच्या ग्लासातून पाणी सांडण्याचे प्रकार वारंवार घडू लागल्याने बॉटलबंद पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.हेही वाचा

प्लास्टिक बंदीला स्थगिती नाहीच- उच्च न्यायालय


संबंधित विषय
ताज्या बातम्या