Advertisement

महापालिका आयुक्त मंगळवारी करणार कामांची पाहणी!

उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना रविवारी तातडीने पाहणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहे. त्यामुळे सर्वाँची रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या पाहणीनंतर महापालिका आयुक्त खुद्द सरप्राईझ विजिट करतील. त्यामुळे सर्व सहायक आयुक्त आणि उपायुक्तांना रविवारी डोळ्यात तेल घालून पाहणी करतानाच त्वरीत उपाययोजनाही हाती घ्याव्या लागणार आहेत.

महापालिका आयुक्त मंगळवारी करणार कामांची पाहणी!
SHARES

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी विविध ठिकाणी रस्ते, पदपथ, पावसाळी जलवाहिनी आणि मलवाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहेत. यासर्व कामांचं साहित्य त्वरीत हलवून पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा यासाठी उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना रविवारी तातडीने पाहणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहे. त्यामुळे सर्वाँची रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या पाहणीनंतर महापालिका आयुक्त खुद्द सरप्राईझ विजिट करतील. त्यामुळे सर्व सहायक आयुक्त आणि उपायुक्तांना रविवारी डोळ्यात तेल घालून पाहणी करतानाच त्वरीत उपाययोजनाही हाती घ्याव्या लागणार आहेत.


'ही' कामे सोमवारपर्यंत पूर्ण करा!

मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची आढावा बैठक शनिवारी पार पडली. या मासिक आढावा बैठकीत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हे निर्देश दिले आहे. मुंबईतील विविध ठिकाणी रस्त्यांची आणि पदपथांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी चर खोदण्याची तसेच भरण्याची कामं देखील सुरू आहेत. यासर्व कामांच्या अनुषंगाने ज्या-ज्या ठिकाणी कामं झाली आहेत; त्या-त्या ठिकाणांवरील जे खडी, डांबर, बॅरिकेड्स इत्यादी साहित्य पडलेले असेल ते तात्काळ योग्य ठिकाणी हलवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ही सर्व कामे येत्या सोमवारपर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.


यांची रविवारची सुट्टी कॅन्सल

या कामांच्या पाहणीसाठी रविवार ३ जून २०१८ रोजी सर्व परिमंडळीय उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी रविवारची सुट्टी न घेता, आपापल्या कार्यक्षेत्रात कर्तव्यावर रहावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या दरम्यान त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रांचा पाहणी दौरा करावा आणि पाहणीदरम्यान काही साहित्य आढळून आल्यास ते तात्काळ हलविण्याची कार्यवाही करवून घ्यावी.


आयुक्तांनी केली ही सूचना

रविवारच्या या पाहणी दौऱ्यादरम्यान स्वतःची काही छायाचित्रे अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना भ्रमणध्वनीद्वारे पाठवावीत, अशाही सूचना केल्या आहेत. या पाहणीनंतर मंगळवारी ५ जून २०१८ रोजी महापालिकेच्या २४ विभागांपैकी काही विभागांमध्ये खुद्द महापालिका आयुक्त अचानक पाहणी दौरा अर्थात सरप्राईझ विजिट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा - 

रखडलेल्या 'या' पादचारी पुलाचं काम वर्षाअखेरीस पूर्ण होणार

महापालिकेचे अभियंते 'एसआरए'त जाणार का?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा