Advertisement

'काळा घोडा'च्या नामकरणाचा प्रस्ताव फेटाळला


'काळा घोडा'च्या नामकरणाचा प्रस्ताव फेटाळला
SHARES

फोर्टमधील काळा घोडा चौकाला इस्त्रायलचे दिवंगत पंतप्रधान शिमोन पेरीज यांचं नाव देण्याचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या ए, बी आणि ई प्रभाग समितीच्या बैठकीत नामंजूर करण्यात आला. या प्रभाग समितीत भाजपाची सदस्य संख्या अधिक असली तरी हा प्रस्ताव शिवसेनेच्या मदतीने बहुमताने फेटाळण्यात आला. हा भाजपासह महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना हा मोठा झटका मांडला जात आहे.

'फेडरेशन ऑफ इंडो इस्त्रायल चेंबर्स ऑफ कॉमर्स'ने काळाघोडा येथील चौकाला पेरीज यांचं नाव द्यावं असं पत्र महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिलं होतं. त्यानुसार आयुक्तांनी हा प्रस्ताव प्रभाग समितीत मंजूरीसाठी न ठेवता आयुक्तांनी हा प्रस्ताव थेट गटनेत्यांच्या सभेत ठेवल्याने आयुक्त अडचणीत सापडले. आयुक्त नगरसेवकांच्या अधिकारावर घाला घालत असल्याची टिका भाजपा वगळता सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी केली. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता.


रेकॉर्डच्या सूचनेला पाठिंबा

दरम्यान नामकरणाचा हा प्रस्ताव ए, बी व ई प्रभाग समितीच्या बैठकीत आला असता काँग्रेसचे नगरसेवक जावेद जुनेजा यांनी त्याला हरकत घेत हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्यात यावा, अशी मागणी केली. पेरीज यांच्यावर अनेक गुन्हे असून त्यांनतरही त्यांना शांततेचं पारितोषिक देण्यात आल्याचं सांगत जुनेजा यांनी प्रस्तावाला विरोध केला. त्याला सपाचे गटनेते रईस शेख यांनी पाठिंबा दिला. मात्र त्यांनतर हा प्रस्ताव मताला टाकला असता शिवसेनेच्या सदस्यांनीही रेकॉर्डच्या सूचनेला पाठिंबा दिला. त्यानुसार भाजपा वगळता विरोधक आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर हा प्रस्ताव रेकोर्ड करण्याचा निर्णय प्रभाग समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी घेतला.


भाजपा, आयुक्तांना धक्का

भाजपाने आपल्या कोट्यातून गीता गवळी यांना प्रभाग समिती अध्यक्ष बनवलं असल्याने त्यांनी भाजपाला आपलं मत दिलं. परंतु भाजपाचा अध्यक्ष असलेल्या प्रभाग समितीत भाजपाचा पाठिंबा असलेला मुद्दाच फेटाळला जातो, हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच नगरसेवक तथा महापौर यांच्यावतीने हा प्रस्ताव न मांडता, आपण स्वतःहा विषय मांडणारे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे.



हेही वाचा-

काळाघोडा चौकाला शिमोन पेरीज यांचं नाव देण्याचा प्रस्ताव बारगळला


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा