Advertisement

एल्फिन्स्टनचे मीनाताई ठाकरे मच्छीमार्केट दुसरीकडे हलवणार


एल्फिन्स्टनचे मीनाताई ठाकरे मच्छीमार्केट दुसरीकडे हलवणार
SHARES

एल्फिन्स्टनच्या मीनाताई ठाकरे मच्छीमार्केमधील कचरा आणि दुर्गंधीचा त्रास मागील १४ वर्षांपासून झेलणाऱ्या रहिवशांना लवकरच मोकळा श्वास घेता येईल. यामागचं कारण म्हणजे हे मच्छीमार्केट दुसरीकडे हलवण्याच्या जोरदार हालचाली मुंबई महापालिकेने सुरू केल्या आहेत.

या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून रहिवासी महापालिका, लोकप्रतिनिधी, पोलीस यांच्याकडे गाऱ्हाणे घालून थकले होते. मात्र कुणीही रहिवाशांच्या या त्रासाची दखल घेतली नाही. अखेर २० सप्टेंबर रोजी 'मुंबई लाइव्ह'ने यासंंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत रहिवाशांची व्यथा सर्वांपुढे मांडली.



'मुंंबई लाइव्ह'च्या वृत्तानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. बुधवारी, ११ आॅक्टोबरला स्थानिक नगरसेविका प्रिती पाटणकर, उद्यान बाजार समिती अध्यक्षा सांवी तांडेल, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार आणि इतर अधिकाऱ्यांनी या मच्छीमार्केटची पाहणी करत रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी नगरसेविका प्रिती पाटणकर यांनी मार्केट स्थलांतर करण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. एवढंच नाही, तर मार्केट स्थलांतरीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने दणका देत मार्केट बंद पाडू, असं आश्वासनही त्यांनी दिल्याचं रहिवाशांनी सांगितलं.


घाणीमुळे दोघांचा मृत्यू

ट्रकमधून मासे आल्यानंतर ते उतरवताना माशांचं घाण पाणी, बर्फ, थर्माकोल, भुसा मच्छीमार्केट आणि आसपासच्या परिसरात पडत असल्याने अनेक रहिवाशांना दुर्गंधीमुळे आजारही जडले. तर या परिसरात दोन महिन्यांत डेंग्यूमुळे दोन तरूणांना जीव गमवावा लागला आहे.




'मुंबई लाइव्ह'चे मानले आभार

गेल्या १४ वर्षांपासून आमच्याकडे महापालिका आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नव्हते. पण 'मुंबई लाइव्ह'ने आमची व्यथा मांडली. प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नाला यश आलं आहे. मार्केट हवलण्याच्या निर्णयामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाल्याचं म्हणत स्थानिकांनी 'मुंबई लाइव्ह'चे आभार मानले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा