Advertisement

अंधेरी, जोगेश्वरीत सहायक आयुक्त प्रशांत सपकाळेंचा कारवाईचा सपाटा


अंधेरी, जोगेश्वरीत सहायक आयुक्त प्रशांत सपकाळेंचा कारवाईचा सपाटा
SHARES

कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या दुघर्टनेनंतर विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व भागाच्या के-पूर्व सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आलेल्या प्रशांत सपकाळे यांनी आपल्या नव्या विभागात कारवाईचा सपाटाच लावला आहे. जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूस वाढीव बांधकामे करून पदपथासह रस्त्यांवर वाढीव बांधकाम करणाऱ्या दुकानांवर कारवाई केल्यानंतर अंधेरी विलेपार्ले भागातील अनधिकृत घरांवर हातोडा चालवण्यात आला आहे.


जोगेश्वरी स्थानकाजवळील बांधकामं सपाट!

जोगेश्वरी रेल्वे स्थानकापासून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारा मार्ग हा दुकानदारांनी वाढीव बांधकाम केल्यामुळे अरुंद बनला होता. त्यामुळे या दुकानांच्या वाढीव बांधकामांवर के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली होती. परंतु, या कारवाईदरम्यान दुकानदारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे केवळ वाढीव छपऱ्या तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुकानांचा अनधिकृत वाढीव सर्वच भाग तोडून टाकला.



पदपथावरही केले होते अतिक्रमण

पदपथाच्या आतील भागासह पदपथाची मोकळी जागाही काबीज करून त्यांनी रस्त्यांपर्यंत दुकाने वाढवली होती. या वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे जोगेश्वरी रेल्वे स्थानक मार्गावरील तब्बल ५० हून अधिक दुकानांचे वाढीव बांधकाम तोडण्यात आल्याची माहिती सपकाळे यांनी दिली आहे.


बिसलेरी जंक्शनजवळही कारवाई

मंगळवारी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बिसलेरी जंक्शनजवळील दोन बांधकामांवर बुलडोझर चालवून ती बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय न्यायालयाच्या आदेशानुसार विलेपार्ले येथील ६ ते ७ घरांची बांधकामे तर सहार रोडवरील दोन बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशांत सपकाळे यांनी दिली.



हेही वाचा

वरळीतील एनएससीआयच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

पालिका अमिताभ बच्चनवर मेहरबान! अनधिकृत बांधकाम केले नियमित


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा