Advertisement

पालिका अमिताभ बच्चनवर मेहरबान! अनधिकृत बांधकाम केले नियमित

सेलिब्रिटींवर पालिका कशी मेहरबान होते? त्यांची अनधिकृत बांधकामे कशी वाचवली जातात? याची धक्कादायक माहिती माहिती अधिकाराखाली समोर आली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं अनधिकृत बांधकाम मुंबई महानगर पालिकेने अधिकृत करून दिल्याचं समोर आलं आहे.

पालिका अमिताभ बच्चनवर मेहरबान! अनधिकृत बांधकाम केले नियमित
SHARES

अनधिकृत झोपड्यांवर वा सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामांवर मुंबई महानगर पालिकेकडून बुलडोझर फिरवला जातो. मात्र, त्याचवेळी सेलिब्रिटींवर पालिका कशी मेहरबान होते? त्यांची अनधिकृत बांधकामे कशी वाचवली जातात? अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहे.


बच्चन यांच्यासह ६ जणांना नोटीस

बिग बी अमिताभ बच्चन यांचा गोरेगावमध्ये बंगला आहे. या बंगल्याचे बांधकाम करताना मंजूर आराखड्यात अनेक बदल करत अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे, बांधकामात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने ७ डिसेंबर २०१६ ला एमआरटीपी कायद्याखाली अमिताभ बच्चन यांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये फक्त अमिताभ बच्चनच नव्हते, तर त्यांच्याबरोबर अन्य सहा जणांचाही समावेश होता. राजकुमार हिरानी, ओबेरॉय रिअॅलिटी, पंकज बलानी, हरेश खंडेलवार, संजय व्यास आणि हरेश जगतानी अशी ही सहा नावं आहेत.


नोटिशीनंतरही कारवाई नाहीच!

बच्चन यांच्यासह या सहाही जणांनी मूळ आराखड्यानुसार बांधकाम न करता अनधिकृत बांधकाम केले होते. नोटीस पाठवल्यानंतर या अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई होणं गरजेचं असताना, पालिकेने मात्र हे अनधिकृत बांधकाम नियमित केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार बच्चन यांच्यासह सहा जणांना बांधकामात अनियमितता आढळल्याने नोटीस बजावली होती.

या नोटिशीनंतर वास्तुविशारद शशांक कोकीळ यांनी ५ जानेवारी २०१७ ला मंजूर आराखड्यात नसलेल्या बाबी मंजूर करण्याकामी सुधारित आराखडे मंजुरीकरता कार्यकारी अभियंता, इमारत व प्रस्ताव (पश्चिम उपनगरे) पी विभाग यांच्याकडे सादर केले. त्यानुसार १७ मार्च २०१७ रोजी इमारत व प्रस्ताव खात्याने सुधारित आराखड्यासंबंधीचा प्रस्ताव नामंजूर केला.


बांधकाम तसेच, सुधारीत आराखडा मंजूर

११ एप्रिल २०१७ ला इमारत व प्रस्ताव खात्याकडून पी दक्षिण कार्यालयाला यासंबंधीची माहिती सादर करण्यात आली. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर ६ मे २०१७ ला पी दक्षिण विभागाने अंतिम आदेश जारी करत अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटवण्याचे आदेश दिले होते. पण ही अनधिकृत बांधकामं या बड्या धेंडांनी पाडलीच नाहीत. असे असताना पुन्हा वास्तुविशारद शशांक कोकीळ यांनी सुधारित आराखडा मंजुरीकरता सादर केला. ऑक्टोबर २०१७ मध्ये तो मंजूरही करून घेत ही अनधिकृत बांधकामं नियमित केल्याचं माहिती अधिकारातून समोर आल्याचं गलगली यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा

‘यह आग कब बुझेगी’? मुंबईकरांनो स्वत:लाच विचारा प्रश्न


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा