Advertisement

मुंबईकरांनो सावधान! २८,१६२ ठिकाणी आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

मुंबईत तब्बल २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूच्या प्रसाराला कारणीभूत ठरणाऱ्या 'एडीस एजिप्ताय' डासांच्या अळ्यांची उत्पत्ती वाढल्याचं पुढे आलं आहे. यातील निम्म्या अर्थात १४ हजार ९३० ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या ड्रममध्ये आढळल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या किटक नियंत्रण खात्याद्वारे देण्यात आली आहे.

मुंबईकरांनो सावधान! २८,१६२ ठिकाणी आढळल्या डेंग्यूच्या अळ्या
SHARES

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरूवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून मुंबईत साथीचे आजार त्यातही मलेरिया आणि डेंग्यू धक्कादायकरीत्या बळावल्याचं दिसत आहे. त्यामागचं कारण आहे हे साथीचे रोग पसरवणाऱ्या डासांची पैदास. होय हे खरं आहे. कारण मुंबईत तब्बल २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूच्या प्रसाराला कारणीभूत ठरणाऱ्या 'एडीस एजिप्ताय' डासांच्या अळ्यांची उत्पत्ती वाढल्याचं पुढे आलं आहे. यातील निम्म्या अर्थात १४ हजार ९३० ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या ड्रममध्ये आढळल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या किटक नियंत्रण खात्याद्वारे देण्यात आली आहे.




सतर्कतेचे आदेश

मुंबईत डेंग्यू डोकं वर काढण्याची शक्यता असल्याने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी डेंग्यूच्या प्रभावी नियंत्रणासाठी पालिकेच्या आरोग्य विभागासह अन्य विभागांना सतर्कतचे आदेश दिले आहेत. आवश्यक त्या उपाययोजना राबवत डेंग्यू नियंत्रणात आणण्यासोबतच व्यापक जनजागृती मोहीम हाती घेत डेंग्यूपासून कसा बचाव करावा हे मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश संंबंधित विभागांना दिले आहेत.




सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी

डेंग्यू आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी किटकनाशक विभागाकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येते. त्यानुसार जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ९९ लाख ८१ हजार २१९ घरांची संयुक्त तपासणी केली आहे. या ९ महिन्यांच्या कालावधीत १ कोटी ७ लाख ८ हजार ९८४ पाणी साठवण वस्तूंची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. ड्रम, फ्रीजचा डिफ्राॅस्ट ट्रे, वातानुकूलित यंत्रणा, टायर्स, बाटल्या, बादल्या, ताडपत्री, पाणी साठवण टाक्या, मनीप्लांटस, थर्माकोल, कुंड्या, कुंड्याखालील ताटल्या, फुलदाणी, घरात लावलेली शोभेची झाडं इत्यादींमध्ये या अळ्या आढळून आल्या आहेत. त्यातही ५३ टक्के, १४ हजार ९३० ठिकाणी अळ्या या ड्रममध्ये आढळल्या आहेत.


बदलत्या वातावरणाचा फटका

ड्रमनंतर ६ हजार ९६८ म्हणजेच २४.७४ ठिकाणी करवंट्या, टायर्स, थर्माकोल, प्लास्टिक बाटल्या आणि झाकणांमध्ये आढळल्या आहेत. तर २०.५८ टक्के अळ्या ५ हजार ७९६ ठिकाणी अळ्या या भांडी, पत्रे पत्र्यांची पन्हाळे अशा ठिकाणी आढळल्या आहेत. ८.५५ ठिकाणी म्हणजेच २ हजार ४०८ ठिकाणी ताडपत्र्यांमध्ये अळ्या आढळल्या आहेत. ही आकडेवारी लक्षात घेता आणि आॅक्टोबरचं वातावरण डेंग्यूच्या आळ्यांच्या उत्पत्तीस पोषक असतं. त्यामुळं डेंग्यू डोकं वर काढण्याची शक्यता व्यक्त करत आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. तर नागारिकांनाही आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.



हेही वाचा-

डेंग्यू, मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून 'असं' करा संरक्षण

स्वाईन फ्लूचा संशयीत रुग्ण आढळला, महापालिकेच्या आरोग्य विभागाचा सावधानतेचा इशारा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा