Advertisement

डेंग्यू, मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून 'असं' करा संरक्षण

तुमच्या घरात वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे हैराण आहात. डासांमुळे घरात आजारी पडण्याचं प्रमाण अधिक आहे. मग तुमच्यासाठी या खास टिप्स...

डेंग्यू, मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून 'असं' करा संरक्षण
SHARES

डासांमुळे पसरणारे आजार आरोग्यासाठी अतीधोकादायक असतात. डास मारण्यासाठी बाजारात अनेक प्रॉडक्टस उपलब्ध आहेत. पण हे प्रॉडक्टस विषारी असतात. त्याचा आपल्या आरोग्यावरदेखील परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे डास पळतील आणि आरोग्यावरही काही परिणाम होणार नाही. या उपायांची अंमलबजावणी केलीत तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

१) नारळाच्या तेलामध्ये कडुलिंबाचं तेल मिक्स करून शरीराला लावा. या उपायाचा डासांपासून बचाव करण्यासाठी उपयोग होतो.

२) कडुलिंबाच्या तेलात कापूर मिसळून एका स्प्रे बाटलीत भरून घ्या. स्प्रेच्या मदतीनं हे मिश्रण तमालपत्रांवर शिंपडा आणि पानं जाळा. हा धूर आरोग्यासाठी धोकादायक नाही. या धुरानं डास पळतील.

३) कडुलिंबाच्या तेलात कापूर मिसळून त्याचा दिवा लावावा. हा दिवा झोपण्याच्या ठिकाणी ठेवावा.

४) नारळ तेलात कडुलिंबाचे तेल, लवंगाचे तेल, पेपरमिंट तेल आणि नीलगिरी तेल समप्रमाणात मिसळून घ्या. हे तेल एका बाटलीत भरून ठेवा. झोपताना त्वचेवर लावा.

५) कडुलिंबाच्या तेलात नीलगिरीचे तेल मिक्स करून याचा वापर करू शकता.

६) कापूर एका खोलीमध्ये जाळून दरवाजे खिडक्या बंद करून ठेवा. यामुळे डास घरांमध्ये येणार नाहीत.



हेही वाचा

'हे' ८ उपाय करतील पालीपासून सुटका

घरात धुमाकूळ घालणाऱ्या झुरळांपासून 'असा' मिळेल सुटकारा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा