Advertisement

बॅरिकेट्स न उभारताच कंत्राटदार करतात काम, पालिकेने ठोठावला दंड

महापालिकेने केलेल्या दंडात्मक कारवाईत कंत्राटदारांमध्ये रस्ते घोटाळ्यातील दोषी कंत्राटदार आणि त्यांच्या संलग्न कंपन्या आघाडीवर आहेत. पूर्व उपनगरातील रस्ते बांधकाम प्रकरणी केलेल्या या कारवाईत तब्बल १९ कंपन्यांनी नियमांचं पालन न केल्याचं निदर्शनास आलं असून त्यानुसार या सर्वांना एकूण ३४ लाख ८६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

बॅरिकेट्स न उभारताच कंत्राटदार करतात काम, पालिकेने ठोठावला दंड
SHARES

रस्ते घोटाळा उघडकीस आल्यानंतरही कंत्राटदारांमध्ये महापालिकेची भीती राहिलेली नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खोदकामांच्या ठिकाणी बॅरेकेट्स न उभारताच कंत्राटदारांकडून कामे केली जात आहेत. त्याने नियमांचं उल्लंघन तर होतंच, परंतु वाहनांनाही धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचं काम महापालिकेने हाती घेतलं आहे.


कोणावर कारवाई?

या दंडात्मक कारवाईत कंत्राटदारांमध्ये रस्ते घोटाळ्यातील दोषी कंत्राटदार आणि त्यांच्या संलग्न कंपन्या आघाडीवर आहेत. पूर्व उपनगरातील रस्ते बांधकाम प्रकरणी केलेल्या या कारवाईत तब्बल १९ कंपन्यांनी नियमांचं पालन न केल्याचं निदर्शनास आलं असून त्यानुसार या सर्वांना एकूण ३४ लाख ८६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.


काय सांगतो नियम?

मुंबई महापालिका क्षेत्रात रस्त्यांची कामे सुरु असताना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कामाच्या ठिकाणी 'बॅरिकेड्स' लावणं कंत्राटदारांना बंधनकारक आहे. निविदा अटींमध्येही अशाप्रकारे बॅरिकेट्स लावणं बंधनकारक असतानाही काही कंत्राटदार या नियमांचं पालन करीत नसल्याचं निदर्शनास आलं होतं.


आयुक्तांचे आदेश

त्यानुसार सूचनांचं पालन न करणाऱ्या कंत्राटदारांकडून दंड वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी मासिक आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार पूर्व उनगरांमध्ये महापालिकेच्या 'एल', 'एम पूर्व', 'एम पश्चिम', 'एन', 'एस', 'टी' या ६ प्रशासकीय विभागांमध्ये रस्ते विषयक काम करणाऱ्या १९ कंपन्यांना रुपये ३४ लाख ८६ हजार ५०० एवढा दंड ठोठावण्यात आला.


कुणाला सर्वाधिक दंड?

या अंतर्गत सर्वाधिक म्हणजे रुपये १२ लाख ८१ हजार ५०० एवढा दंड हा 'मे. स्पेको इंफ्रास्ट्रक्चर' या कंत्राटदाराला करण्यात आला आहे. या कंत्राटदाराद्वारे सुरू असलेल्या ४ रस्ते कामांच्या ठिकाणी 'बॅरिकेड्स' लावले नसल्याचं आढळून आल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कंपनी काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची संलग्न कंपनी आहे.

या खालोखाल ६ लाख रुपये एवढा दंड 'मे. एपीआय सिव्हीलकॉन प्रा. लि. - बिटकॉन इंडिया' (संयुक्त उपक्रम) यांना करण्यात आला आहे. तर ४ लाख ६६ हजार रुपये एवढा दंड 'मे. प्रकाश इंजिनिअर्स अॅण्ड इंफ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.' या कंपनीवर आकारण्यात आला आहे. ही कंपनी रस्ते घोटाळा प्रकरणी दोषी आढळून आली होती. यानुसार या तीन कंत्राटदारांवरच एकूण २३ लाख ४७ हजार ५०० एवढा ठोठावण्यात आला आहे.


कारवाई करण्यात आलेले कंत्राटदार:

  • मे. स्पेको इंफ्रास्ट्रक्चर
  • मे. एपीआय सिव्हीलकॉन प्रा. लि. - बिटकॉन इंडिया (संयुक्त उपक्रम)
  • प्रकाश इंजिनिअर्स अॅण्ड इंफ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.
  • मे. शांतीनाथ रोडवेज
  • मे. लॅण्डमार्क कॉर्पेारेशन प्रा. लि.
  • मे. जी. एल. कंन्स्ट्रक्शन,
  • मे. ब्युकॉन इंजिनिअर्स अॅण्ड इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि.
  • मे. देव इंजिनिअर्स
  • मे. नवदीप कंन्स्ट्रक्शन कंपनी
  • मे. न्यू इंडिया कंन्स्ट्रक्शन अॅण्ड ग्यान
  • मे. महावीर रोड्स अॅण्ड इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि.
  • मे. न्यू इंडिया कंन्स्ट्रक्शन कंपनी
  • मे. प्रीती कंन्स्ट्रक्शन कंपनी
  • मे. एम. बी. इंन्फ्रा प्रोजेक्ट्स
  • मे. शाह अॅण्ड पारीख
  • मे. एम. इ. इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रि. लि.
  • मे. एच. व्ही. कंन्स्ट्रक्शन,
  • मे. नीव इंफ्रा लि.
  • सनराईज स्टोन इंडंस्ट्रीज

हेही वाचा-





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा