Advertisement

मुंबईकरांच्या पाणीपट्टीत २.४८ टक्क्यांनी वाढ

पालिका प्रशासनानं आस्थापना, प्रचालन व परिरक्षण आणि शासकीय धरणातून उपसा करण्यात येणाऱ्या पाण्यावरील खर्चात झालेली वाढ लक्षात घेत पाणीपट्टीमध्ये २.४८ टक्क्यांनी वाढ केली आहे.

मुंबईकरांच्या पाणीपट्टीत २.४८ टक्क्यांनी वाढ
SHARES

भातसा धरणातील झडपांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबईकरांना पाणीकपातील सामोरं जावं लागतं आहे. मात्र असं असताना मुंबईकरांना पाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पालिका प्रशासनानं आस्थापना, प्रचालन व परिरक्षण आणि शासकीय धरणातून उपसा करण्यात येणाऱ्या पाण्यावरील खर्चात झालेली वाढ लक्षात घेत पाणीपट्टीमध्ये २.४८ टक्क्यांनी वाढ केली आहे. येत्या १६ जून पासून नवीन दरवाढ लागू करण्यात येणार आहे.

स्थायी समितीत निवेदन

जून महिन्यात दरवर्षी पाणीपट्टीत वाढ करण्यात येते. ८ टक्के पर्यंतची पाणीपट्टीवाढ करण्याचा अधिकार मुंबई महापालिका प्रशासनाला आहे. त्यानुसार, पाणीपट्टीत ही वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ३.७२ टक्के पाणीपट्टीत वाढ करण्यात आली होती. यंदा ही वाढ २.४८ टक्के असणार आहे. याबाबत बुधवारी पालिका प्रशासनानं स्थायी समितीमध्ये निवेदन केले आहे.

१० टक्के पाणीकपात

पाणीपट्टीतील वाढीनुसार, घरगुती पाणीदरात सरासरी १० ते १५ पैसे तर व्यावसायिक पाणीदरात १ ते ४ रुपयापर्यंत वाढ झाली आहे. मात्र, मुंबईत सध्या सुरू असलेल्या १० टक्के पाणीकपातीमुळं मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.



हेही वाचा -

दहावीच्या घसरलेल्या निकालाबाबत आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

बेस्टच्या ताफ्यात ३ महिन्यात दाखल होणार २५ टक्के बसगाड्या



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा