Advertisement

तर बीइंग ह्युमन काळ्या यादीत जाणार!


तर बीइंग ह्युमन काळ्या यादीत जाणार!
SHARES

मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक-खासगी भागीदारी(पीपीपी)तत्वावर डाएलिसीस केंद्र उभारण्यांसाठी सलमान खानच्या बीइंग ह्युमन दी सलमान फाऊंडेशन या संस्थाेची निवड झाल्याचा मोठा गवगवा झाला होता. प्रत्यक्षात मात्र या संस्थेकडून केंद्र उभारण्यास टाळाटाळ केली जात आहे. सव्वा वर्ष उलटले तरी या संस्थेने अद्याप डाएलिसीस केंद्र उभारणीच्या कामाला सुरुवातच केलेली नाही. त्यामुळे अखेर या संस्थेला महापालिकेकडून काळया यादीत टाकण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आपल्याला काळ्या यादीत का टाकू नये? अशा प्रकारची नोटीसच या संस्थेला जारी केल्याचे समजते.


१९९ डाएलिसीस यंत्रांसाठी निविदा

महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व मध्यवर्ती खरेदी खाते यांच्या माध्यमातून संयुक्तपणे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर १२ ठिकाणी डाएलिसीस केंद्र उभारण्यासाठी स्वयंसेवी संस्था, कंपन्या वा व्यवसायिक आस्थापनं इत्यादींकडून जुलै २०१६मध्ये निविदा मागवण्यत आल्या होत्या. या १२ ठिकाणी १९९ डाएलिसीस यंत्र बसवण्यात येणार होते.


आजवर केंद्राचे काम सुरुच झाले नाही

यामध्ये वांद्रे पश्चिम येथील सेंट जॉन अलाईड सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेत डाएलिसीस केंद्र उभारण्यासाठी ‘बीइंग ह्युमन दी सलमान खान फाऊंडेशन’ची निवड करण्यात आली. या संस्थेकडून ३३९ दरात ही सेवा दिली जाणार होती. जी महापालिकेच्या रुग्णालयातील दरापेक्षा ३ टक्क्यांनी कमी आहे. या संस्थेकडून २४ यंत्र बसवले जाणार होते. परंतु, डिसेंबर २०१६मध्ये या संस्थेची निवड झाल्यानंतर आजपर्यंत केंद्राचे काम सुरुच झालेले नाही.


केंद्र उभारण्यास असमर्थता?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संस्थेने काही अडचणींमुळे हे केंद्र उभारणीसाठी पुढाकार घेतला नव्हता. परंतु आता तर ही संस्था केंद्र उभारण्यास तयारच नसल्याची माहिती समोर येत आहे. या संस्थेने निवड झाल्यानंतर अनामत रक्कम, बँक हमी, तसेच इतर सर्व प्रकारची रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे. परंतु ही रक्कम जमा केल्यानंतर आता मात्र, ते केंद्र उभारण्यास असमर्थता दर्शवत असल्याचे बोलले जात आहे.

'बीइंग ह्युमन' या संस्थेने दिलेल्या मुदतीत केंद्र उभारलेले नाही. त्यांना हे केंद्र सुरु करण्याबाबत स्मरणपत्र पाठवले असून त्यानंतरही जर त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल.

पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान यांच्या संस्थेने या केंद्राची उभारणी न केल्यास त्यांच्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची तरतूद महापालिकेच्या नियमांमध्ये आहे. त्यामुळे आता 'बीइंग ह्युमन' काळ्या यादीत जाण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

तर, मुंबई नामशेष होईल अन् मेट्रोच उरेल: उच्च न्यायालय


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा