Advertisement

मास्क नाही तर प्रवेश नाही, बीएमसीकडून कारवाईचा बडगा

मुंबईत आता मास्त न घालता बाहेर पडणं मुश्कील होणार आहे. मास्क न घालणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत.

मास्क नाही तर प्रवेश नाही, बीएमसीकडून कारवाईचा बडगा
SHARES

मुंबईत आता मास्त न घालता बाहेर पडणं मुश्कील होणार आहे. मास्क न घालणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. पालिकेने 'मास्क नाही तर प्रवेश नाही' अशी मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. अनेक लोक बाहेर पडताना मास्क घालत नसल्याचं आढळून आलं आहे. पालिकेने अशा लोकांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे.  मुंबईत रोज तब्बल वीस हजार नागरिक विना मास्क फिरताना आढळून येत असून त्यांच्यावर कारवाईचे कडक निर्देश आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी जारी केले आहेत.


विनामास्क फिरणाऱ्यांमुळे संसर्ग पुन्हा फैलावत असल्याचे आढळून आल्याने पालिकेने मास्क न लावणाऱ्यांविरूद्ध जोरदार कारवाई सुरू केली आहे. चेहऱ्यांवर मास्क नसेल तर सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेतील बेस्ट बस, रिक्षा, टॅक्‍सी तसेच सोसायट्या, मॉल्स व कार्यालयांमध्ये प्रवेश दिला जात नाही. 'मास्‍क नसल्‍यास प्रवेश मिळणार नाह‍ी', अशा आशयाचा मजकूर असणारे स्‍टीकर्स संबंधित ठिकाणी लावण्‍यात आले आहेत.


 सध्या मुंबईमध्ये दररोज ९५० लोक मास्क न घातलेले पकडण्यात येत आहे. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत ३१ हजार ५०० हून अधिक विना मास्क लोकांना पकडले आहे. त्यांच्याकडून ८७ लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. तसंच रस्त्यावर थुंकणाऱ्या १६०७ लोकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.



हेही वाचा -

केम्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा