Advertisement

रेल्वे स्थानकांच्या अतिक्रमणांवर महापालिकेची नजर


रेल्वे स्थानकांच्या अतिक्रमणांवर महापालिकेची नजर
SHARES

मुंबईतील बहुतांश सर्वच रेल्वे स्थानकांना अतिक्रमणांचा विळखा बसला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना या अतिक्रमणातून वाट काढत धड चालताही येत नाही अन् वाहनांना स्थानकाजवळ येताही येत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसराला बसलेला अतिक्रमणाचा विळखा साेडविण्यासाठी महापालिकेने धडक मोहीम हाती घेत आहे.


स्थानकात जाण्या-येण्यास त्रास

मुंबईतील सर्व अनधिकृत कमर्शियल बांधकामे, रस्त्यांवर वर्षानुवर्षे भंगारवजा पडून राहिलेली वाहने तसेच खाद्यपदार्थ विक्रेते आणि त्यांच्याकडील गॅस सिलेंडर आदीविरोधात कडक कारवाई केल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांकडे लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईकरांना स्थानकात जाता येता होणारा त्रास लक्षात घेता ही धडक कारवाई केली जाणार आहे.


कारवाईचा सपाटा

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या सूचनेनुसार ही कारवाई हाती घेण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली आहे. उपायुक्त रणजीत ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई हाती घेऊन ज्या ज्या रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमणाचा विळखा आहे, तो विळखा सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जकात विभागातील अनेक कामगारांना अतिक्रमण विभागात सामावून घेण्यात आले आहे. या कामगारांच्या मदतीने ही मोहीम हाती घेतली जाईल.

मुंबईतील अनेक कमर्शियल अनधिकृत बांधकामे यशस्वीरित्या तोडण्यात आली आहेत. त्यांनतर खाद्यपदार्थ विकेत्यांकडून वापरण्यात येणाऱ्या गॅस वितरक कंपन्यांविरोधात पोलीस तक्रार करून कारवाई करण्यात आली. तसेच मुंबईतील अनेक रस्त्यांवर जी वाहने वर्षानवर्षे उभी होती, त्यांच्याविरोधात कारवाई करून ती सर्व वाहने लिलावात विकून टाकण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीतील महसूल वाढला तसेच या वाहनांमध्ये पावसाळ्या पाणी साचून डासांमुळे उदभवणारे आजारांचे प्रमाणही कमी करता आले. 


चालण्यास मोकळ्या जागा

या सर्व कारवाईनंतर आता मोर्चा रेल्वे स्थानकाशेजारी अतिक्रमणांवर वळवला असून दादर, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव,  कांदिवली, बोरीवली तसेच कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, मस्जिद बंदर आदी प्रमुख रेल्वे स्थानकांसह सर्व रेल्वे स्थानकाच्या परिसरातील सर्व अतिक्रमणांवर कारवाई करून प्रवाशांना आणि पर्यायाने मुंबईकरांना चालण्यास मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे जऱ्हाड यांनी सांगितले.



हे देखील वाचा -

भंगारातील टाकाऊ सामानाच्या विल्हेवाटीसाठी 'जंक यार्ड'!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा