Advertisement

भंगारातील टाकाऊ सामानाच्या विल्हेवाटीसाठी 'जंक यार्ड'!


भंगारातील टाकाऊ सामानाच्या विल्हेवाटीसाठी 'जंक यार्ड'!
SHARES

घरातील टाकाऊ समान आपण भंगारवाल्याला विकतो. मग त्यानंतर तो भंगारवाला त्या टाकाऊ समानाला पुन्हा बाजारात विकण्याच्या प्रयत्नात असतो. पण अनेकदा टाकाऊ वस्तूला किंमत मिळत नाही, म्हणून तो भंगारवाला मोकळ्या जागेत फेकून देतो. परिणामी आसपासच्या भागात अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे भंगारवाल्यांकडून फेकल्या जाणाऱ्या सामानाची विल्हेवाट लावता यावी, यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत 'जंक यार्ड' तयार करण्याची मागणी होत आहे.


'भंगार सामान व्यावसायिकांना शुल्क द्या'

मुंबईमध्ये भंगार व्यवसायिकांकडे पुनर्वापरायोग्य नसलेल्या सामानाचे एकत्रित संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्याकरता प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये 'जंक यार्ड' उभारण्यात यावे आणि या सामानाची विल्हेवाट लावण्यासाठी अशा भंगार व्यावसायिकांना त्या बदल्यात ठराविक शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.

मुंबईत अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. घर, कारखाना, दुकाने, गॅरेज इत्यादी ठिकाणी निर्माण होणाऱ्या भंगारातून संबंधित व्यावसायिक वापरण्यायोग्य सामानाचा पुनर्वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी एक प्रकारे मदतच करत असतात.

भंगाराच्या खरेदी-विक्रीतून व्यावसायिकाच्या कुटुंबाचा उदारनिर्वाहही होत असतो. परंतु, अशा भंगारामधील वापरण्यायोग्य नसलेले सामान हे व्यवसायिक एकत्रच फेकून देतात. त्यामुळे नाले तुंबणे, रस्त्यावर अडथळे निर्माण होऊन परिसर अस्वच्छ होत असतात. परिणामी पर्यावरणाची हानी होते, असेही सईदा म्हणाल्या.

भंगार व्यावसायिकाकडील पुनर्वापरायोग्य नसलेले सामान टाळण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये एखादी जागा निश्चित केल्यास सर्व भंगार व्यावसायिक नको असलेले सामान त्याठिकाणी टाकतील. त्यामुळे हे सामान जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याकरता महापालिकेने पुढाकार घेतल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही.

डॉ. सईदा खान, नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस



हेही वाचा - 

कचऱ्याच्या गाडीत रॅबिट; कचरा कंत्राटदारांविरोधात एफआयआर दाखल

मुंबईतून बेवारस वाहनांचं सहा लाख किलो भंगार साफ!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा