Advertisement

बेस्टच्या कामगारांचं दिवाळं, डिसेंबरपासून कापून घेणार दिवाळीची उचल


बेस्टच्या कामगारांचं दिवाळं, डिसेंबरपासून कापून घेणार दिवाळीची उचल
SHARES

बेस्ट कामगारांना दिवाळीनिमित्त देण्यात आलेल्या साडेपाच हजार रुपयांची आगाऊ रक्कम येत्या जानेवारी महिन्यापासून त्यांच्या पगारातून कापून घेण्यात येणार आहे. बेस्ट कामगार, कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली ही रक्कम पगारातून कापून घेतली जाणार नाही, असे महापौर आणि बेस्ट समिती अध्यक्षांनी प्रसारमाध्यमांपुढे छाती ठोकून सांगितले होते.


भाजपच्या एकाही सदस्याचा विरोध नाही

प्रत्यक्षात मात्र महापालिकेने बेस्ट कामगारांना दिलेली सानुग्रह अनुदानाची आगाऊ रक्कम कापून घेण्याचा निर्णय घेत स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावावर विरोधी पक्षांच्या गैरहजेरीत सत्ताधारी आणि पहारेकरी असलेल्या भाजपाच्या एकाही सदस्याने विरोध केला नाही. त्यामुळे ही रक्कम कापून घेण्यास स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी मंजुरी दिली.

महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यात आल्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृहनेते यशवंत जाधव आणि बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी पुढाकार घेऊन बेस्ट कामगारांनाही साडेपाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यानुसार महापालिकेकडून २१.६४ कोटी रुपये हे बेस्टला देण्यात येणाऱ्या निधीतून वळते करण्यात आले होते.


महापौरांच्या शब्दाचं झालं काय?

बेस्ट उपक्रम हा महापालिकेत विलीन होणार असल्यामुळे कामगारांना हे पैसे द्यावे लागणार नाहीत, असे महापौरांनी स्पष्ट केले होते. परंतु, दिवाळीला दिलेल्या या साडेपाच हजार रुपयांची रक्कम आता ११ महिन्यांच्या कालावधीत कापून घेण्याचा निर्णयच महापालिकेने घेतला आहे. डिसेंबर महिन्याचा मासिक वेतनापासून पुढील ११ महिने प्रत्येकी ५०० रुपये कापले जाणार आहेत.


शिवसेनेचीही अळीमिळी गुपचिळी

वेतनातून वसूल करण्यात येणारी रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करण्यात येणाऱ्या १६०० कोटी रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी आयसीआयसीआय बँकेतील (इस्क्रो) खात्यात जमा होणाऱ्या ४०.५८ कोटीच्या मासिक हप्त्यासोबतच महापालिकेच्या सर्वसाधारण निधीत जमा करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने या प्रस्तावात नमूद केले होते. त्यामुळे या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेना विरोध करेल, असे बोलले जात होते. परंतु, प्रत्यक्षात शिवसेनेच्या एकाही सदस्याने यावर तोंड न उघडता प्रशासनाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरच्या पगारापासून ५०० रुपये कापून घेतले जाणार आहेत.



हेही वाचा

घरचा आहेर! रावते म्हणतात, 'युनियन्समुळे बेस्ट तोट्यात'!

तर, 'बेस्ट' कायमची बंद करावी लागेल, महापालिका आयुक्तांची हतबलता


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा