महापालिका उद्यानांतील 'अॅम्फीथिएटर्स' मध्ये सादर होणार कलाविष्कार

शहरात विविध ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या उद्यानांमध्ये २८ खुली वर्तुळाकार नाट्यगृहे आहेत. या नाट्यगृहांमध्ये कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी वर्तुळाकार आणि अर्ध वर्तुळाकार मंच उपलब्ध आहेत. तसंच या मंचाभोवती अासन व्यवस्थाही आहे.

SHARE

महापलिकेच्या २८ उद्यानांमध्ये ४ हजार २६० एवढ्या आसनक्षमतेची खुली वर्तुळाकार नाट्यगृहे आहेत. या नाट्यगृहांचा योग्य वापर व्हावा, यासाठी मुंबई कला, संगीत व संस्कृती आयोग यांनी महापालिका प्रशासनाला ही नाट्यगृहे कलाकारांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सुचवलं होतं. त्यानुसार, प्रशासनानं उद्यान खात्याला त्यांच्या अख्यातरित असलेल्या खुल्या नाटगृहांचं परिक्षण व साफसफाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या खुल्या नाट्यगृहांच्या परिक्षण आणि साफसफाईचं काम सुरु झालं असून ही नाट्यगृहे लवकरच कलाकारांनी आपली कला सादर करण्यासाठी मिळणार आहेत.


उद्यानात सुविधा

शहरात विविध ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या उद्यानांमध्ये २८ खुली वर्तुळाकार नाट्यगृहे आहेत. या नाट्यगृहांमध्ये कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी वर्तुळाकार आणि अर्ध वर्तुळाकार मंच उपलब्ध आहेत. तसंच या मंचाभोवती अासन व्यवस्थाही आहे. या खुल्या नाट्यगृहांचा योग्य वापर होण्यासाठी गेल्यावर्षी 'मुंबई कला, संगीत व संस्कृती आयोग' यांनी महापालिका प्रशासनाला खुल्या नाट्यगृहांचे परिरक्षण करण्यासह परिसरातील कलाकारांना त्यांच्या कलांचे सदरीकरण करण्यासाठी व्यासपिठ उपलब्ध करण्याच्या सुचना दिल्या होत्या.


परवानगी लागणार

या नाट्यगृहांमध्ये गायक, वादक, नृत्यसाधक यांना आपल्या कला सादर करता येणार आहेत. त्यासाठी नाव नोंदणी, शुल्क आणि संबंधित कार्यपद्धतीबाबत महापालिका प्रशासन व मुंबई कला, संगीत व संस्कृती आयोग यांच्या स्तरावर कार्यवाही सुरु आहे. तसंच, सध्या असलेल्या कार्यपद्धतीनुसार या खुल्या नाट्यगृहांमध्ये कार्यक्रम करण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान खात्याची परवानगी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या उद्यान खात्याचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.हेही वाचा-

कमला मिल आग: ९ कामचुकार अधिकाऱ्यांना महापालिकेची नोटीस

बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या लॉनवर पडणार हातोडा ?संबंधित विषय
ताज्या बातम्या