Advertisement

झोपडपट्टीतही आता मुबलक पाणी, प्रति माणशी ९० लिटर्स मिळणार!

शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी झोपडपट्टीतील कुटुंबाला प्रति माणशी ९० लिटर्स पाणीपुरवठा करण्याची ठरावाची सूचना महापालिका सभागृहात मांडली. ही ठरावाची सूचना मंजूर करण्यात आली आहे. याचबरोबर इमारतींमधील नागरिकांनाही प्रति माणशी १८० लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा करण्याचा ठरावही करण्यात आला आहे.

झोपडपट्टीतही आता मुबलक पाणी, प्रति माणशी ९० लिटर्स मिळणार!
SHARES

मुंबईकरांना महापालिकेकडून मुबलक पाण्याचा पुरवठा करण्यात येत असला तरी झोपडपट्टीतील रहिवासी कुटुंबाला प्रति माणशी केवळ ४५ लिटर्स एवढाचा पाण्याचा पुरवठा होतो. हे पाणी अपुरं ठरत असल्याने शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी झोपडपट्टीतील कुटुंबाला प्रति माणशी ९० लिटर्स पाणीपुरवठा करण्याची ठरावाची सूचना महापालिका सभागृहात मांडली. ही ठरावाची सूचना मंजूर करण्यात आली आहे. याचबरोबर इमारतींमधील नागरिकांनाही प्रति माणशी १८० लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा करण्याचा ठरावही करण्यात आला आहे.


मुंबईला किती पाणीपुरवठा?

मुंबईला तानसा, मोडकसागर, वैतरणा, तुळशी, विहार, भातसा आणि मध्य वैतरणा आदी धरणांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष लिटर्स (३७५ कोटी लिटर्स) एवढा पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे मुंबईकरांना हा पाण्याचा पुरवठा करताना कुटुंबातील ५ माणसे गृहित धरून पाण्याचे नियोजन केलं जातं. त्याप्रमाणे झोपडपट्टीतील कुटुंबामधील ५ माणसे गृहीत धरून प्रति माणशी ४५ लिटर्स आणि इमारतींमधील सदनिकांमध्ये ५ माणसे गृहित धरून प्रति माणशी १३५ लिटर्स इतका पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.



नागरी वस्तीतली सद्यस्थिती काय?

पूर्वी ५०० चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या सदनिकेसाठी ७ माणसांना पुरेल इतका पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु सध्या मुंबईतील अनेक इमारतींचा पुनर्विकास होऊन अधिक क्षेत्रफळाच्या सदनिका बांधण्यात येत आहेत. त्यामुळे या इमारतींमधील मोठ्या घरांमध्ये राहणाऱ्या तसेच झोपडपट्टींमध्ये राहणाऱ्या माणसांचा विचार केल्यास त्यांना वापरासाठी लागणारं पाण्याचं प्रमाण महापालिका सध्या पुरवठा करत असलेल्या प्रमाणापेक्षा कमीच असल्याची खंत शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी व्यक्त केली आहे.


'डब्ल्यूएचओ'चा नियम

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार प्रतिमाणशी १८० लिटर्स पाण्याचा पुरवठा करणे हे गरजेचं असून त्यामुळे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला प्रति माणशी ९० लिटर्स तर इमारतींमधील सदनिकांमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला प्रति माणशी १८० लिटर्स याप्रमाणे पाणी पुरवठा करण्या यावा, अशी मागणी त्यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.


खिशाला भार नाही

ही ठरावाची सूचना मंजूर करण्यात आली असून यानुसार भविष्यात महापालिकेने पाणी पुरवठ्याचं नियोजन केल्यास मुंबईकरांची होणारी गैरसोय टळणार आहे. झोपडपट्टी व इमातरींमधील सदनिकांमधील नागरिकांना पाण्याच्या पुरवठयाचं प्रमाण निश्चित केलं असून यापेक्षा अधिक पाणी वापरल्यास त्यांना जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे हे प्रमाण वाढल्यास अधिक पाणी मिळेल आणि सध्याच्या तुलनेत अधिक पाणी वापरल्याने जे पैसे मोजावे लागतात तेही मोजावे लागणार नाहीत.



हेही वाचा-

मुंबईतील जलवाहिनींवर केवळ ९० हजार स्वयंचलित जलमापके

महापालिकेचा हलगर्जीपणा? मृतांच्या नातेवाईकांना मिळणार ५ लाख


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा