Advertisement

मुंबईतील 'या' उड्डाणपुलावर पालिकेकडून स्पीड लिमिट सिस्टम

अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबईतील 'या' उड्डाणपुलावर पालिकेकडून स्पीड लिमिट सिस्टम
SHARES

मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने गेल्यास भुर्दंड बसेल. स्पिड लिमिटचा नियम मोडल्यास मुंबई पालिकेकडून दंड वसूल केला जाणार आहे.

वाढते अपघात रोखण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यासाठी 50 लाख रुपये खर्च करून उड्डाणपुलावर ‘स्पीड व्हायलोशन डिटेक्शन सिस्टम’ बसवण्यात येणार आहे. या सिस्टिमद्वारे उड्डाणपुलावर बसवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यामुळे भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांची स्पीड लिमिट तपासली जाणार आहे. तर वेगमर्यादा पार केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला आहे. 

घाटकोपरवरुन वाशी, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड बनवण्यात आला आहे. दरम्यान,  या पुलामुळे पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता आणि पूर्व मुक्त मार्गावरुन येणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी फोडण्यास मदत होणार आहे.

अवजड वाहने आणि दुचाकी वाहनांसाठी बंद 

घाटकोपर, मानखुर्द लिंक रोड फ्लायओव्हरवर मुंबई पालिका स्पीड व्हायलेशन डिटेक्टर बसवणार आहे. वाहतूक पोलीस मुख्यालयात वेगाचे उल्लंघन करण्यासाठी सध्याच्या केंद्रीय नियंत्रण सॉफ्टवेअरसोबत स्पीड व्हायोलेशन डिटेक्शन सिस्टीमचे एकत्रीकरण केले जाईल. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येणार आहे. हा उड्डाणपूल अपघातप्रवण असल्याने अवजड वाहने आणि दुचाकी वाहनांसाठी बंद आहे.हेही वाचा

गुडन्यूज! मेट्रो 7 मार्गावरील दोन फूटब्रिज जनतेसाठी खुले

गोराई जेट्टी आणि बीचचे सुशोभीकरण पालिका करणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा