Advertisement

मुंबई महापालिकेचा एशिया पॅसिफिक पुरस्काराने गौरव

महापालिकेने रतनसी मुलजी जेठा फाऊंटनला पुन्हा एकदा सुस्थितीत आणलं आहे. महापालिकेच्या या रिस्टोरेशन प्रकल्पाची नोंद युनेस्कोद्वारे घेण्यात आली असून नुकत्याच जारी करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या एशिया पॅसिफिक पुरस्काराने मुंबई महापालिकेला गौरविण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेचा एशिया पॅसिफिक पुरस्काराने गौरव
SHARES

दक्षिण मुंबईतील मुख्य टपाल कार्यालयासमोरील मिंट मार्गावरील रतनसी मुलजी जेठा फाऊंटन गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होतं. याची दखल घेत मुंबई महापालिकेने या फाऊंटनची डागडुजी केली आणि या फाऊंटनला पुन्हा एकदा सुस्थितीत आणलं. महापालिकेच्या या रिस्टोरेशन प्रकल्पाची नोंद युनेस्कोद्वारे घेण्यात आली असून नुकत्याच जारी करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या एशिया पॅसिफिक पुरस्काराने मुंबई महापालिकेला गौरविण्यात आलं आहे.


मुंबईचं वारसास्थळ

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'ए' विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १८९४ साली रतनसी मुलजी जेठा फाऊंटन उभारण्यात आलं होतं. इंडो सेरेसेनिक या स्थापत्य शैलीतील हे कारंजे महापालिकेच्या वारसा जतन यादी दर्जा १ मधील वारसास्थळ समजलं जातं. परंतु सव्वाशे वर्ष जुन्या असलेल्या या फाऊंटनला अवकळा प्राप्त झाली होती.


सार्वजनिक खासगी भागीदारी

त्यामुळे महापालिकेने या कारंज्याचं गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी काळा घोडा असोसिएशनच्या सहकार्यानं प्रकल्प हाती घेतला. २०१५ ते जानेवारी २०१८ या कालावधीत हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी काळाघोडा असोसिएशन द्वारे आवश्यक तो खर्च करण्यात आला असून वास्तूविशारद विकास दिलावरी यांचं मार्गदर्शनही या प्रकल्पासाठी लाभलं.


मुंबईकरांना बघता येणार

या यशस्वी कामानंतर हे कारंज मुंबईकरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार रतनसी मुलजी जेठा फाऊंटन दररोज सकाळी ९ ते १० च्या दरम्यान आणि संध्याकाळी सुर्यास्तापूर्वी व सुर्यास्तानंतर प्रत्येकी ३० मिनीटे यानुसार रोज २ तास सुरू राहणार आहे. सध्या या कारंज्याचं दैनंदिन परीक्षण काळा घोडा असोसिएशनद्वारे केलं जात असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर चोरे यांनी दिली.



हेही वाचा-

माहुलवासीयांना कुर्ल्यातील संक्रमण शिबिरांत हलवणार

दिवाळी संपली तरी बेस्टचे कर्मचारी बोनसच्या प्रतीक्षेत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा