Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर हायकोर्टाची नाराजी


बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर हायकोर्टाची नाराजी
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयानं कर्मचाऱ्यांच्या संपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 'सर्वसामान्यांना वेठीस धरू नका, अशा शब्दांत न्यायालयानं कर्मचाऱ्यांना फटकारलं आहे.

'तुम्हाला नेमक काय हवं आहे. तुम्हाला चर्चाही करायची नाही आणि संपही मागे घ्यायचा नाही, अशी न्यायालयानं सुनावणीवेळी विचारणा केली. तसंच शुक्रवारी संप मागे घेऊन कामावर रुजू व्हाल अशी अपेक्षा होती, असंही सुनावणीवेळी न्यायालयानं म्हटलं. त्याचप्रमाणे, आम्ही चर्चेस तयार आहोत, तुम्ही संप मागे घ्या, असं  महानगरपालिकेनं न्यायालयात सांगितलं. 

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मागील सहा दिवसांपासून अनेक बैठका आणि चर्चा झाल्या. मात्र, या बैठकाही निष्फळ ठरल्या. त्यामुळं राज्य सरकारनं उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती नेमली. ही समिती बेस्ट संपाबाबत काहीतरी तोडगा काढेल अशी अपेक्षा होती. त्यानुसार, उच्चस्तरीय समिती आणि कृती समितीमध्ये बैठका झाल्या. परंतु, त्यातूनही कोणता तोडगा निघालेला नाही. त्यामुळं बेस्ट संपाबाबत न्यायालय कोणते आदेश देते याकडे कामगार संघटनांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.


हेही वाचा

बेस्ट संपाचा सातवा दिवस, प्रवाशांचे अतोनात हाल

'संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं काम बंद' : मनसे


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा