Advertisement

आरे कारशेडचा मार्ग मोकळा, कारशेडविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई न्यायालयानं आरेतील ३३ हेक्टर जागा कारशेडसाठी राखीव ठेवण्यासंबंधी काढलेला अध्यादेश कायदेशीरच असून कारशेड बांधताना 'एमएमआरसी'ला सर्व कायद्यांचं कठोर पालन करावं लागेल असं म्हणत पर्यावरणप्रेमींची याचिका फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.

आरे कारशेडचा मार्ग मोकळा, कारशेडविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पातील आरे कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो कारशेडला विरोध करणारी पर्यावरणप्रेमींची याचिका शुक्रवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेड आरेतच उभारण्यात येणार असून हा मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)साठी मोठा दिलासा मानला जात आहे.


पर्यावरणप्रेमींची याचिका

भुयारी मेट्रो-३ प्रकल्पातील कारशेड आरे जंगलात उभारण्यात येणार आहे. त्याला पर्यावरणप्रेमी आणि सेव्ह आरे ग्रुपने विरोध केला आहे. या कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमी आणि सेव्ह आरेने न्यायालयीन लढा उभारला आहे. त्याचाच भाग म्हणून पर्यावरणप्रेमींनी आरे कारशेडविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेनुसार आरेतील १०३ किमीची जागा संरक्षित करत आरेत कोणत्याही प्रकारचं बांधकाम करण्यास बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


अध्यादेश कायदेशीरच

या याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत 'एमएमआरसी'ला मोठा दिलासा दिला आहे. ३३ हेक्टर जागा आरे कारशेडसाठी राखीव ठेवण्याला याचिकाकर्त्यांचा विरोध होता. पण न्यायालयानं मात्र ३३ हेक्टर जागा कारशेडसाठी राखीव ठेवण्यासंबंधी काढलेला अध्यादेश कायदेशीरच असून कारशेड बांधताना 'एमएमआरसी'ला सर्व कायद्यांचं कठोर पालन करावं लागेल असं म्हणत पर्यावरणप्रेमींची याचिका फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.


सर्वोच्च न्यायालयात जाणार?

याविषयी 'सेव्ह आरे'च्या सदस्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आदेशाची प्रत हाती पडल्यानंतरच यावर अधिक बोलता येईल, असं सांगितलं आहे. गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचीही तयारी दर्शवली आहे. पण एकंदरच मेट्रो-३ मधील सर्वात मोठा अडथळा आता दूर झाला असून मेट्रो-३ चं काम आता वेग घेईल असं म्हटलं जात आहे.



हेही वाचा-

नाहीतर, आरेतील सगळ्या झाडांच्या कत्तलीवर स्थगिती आणू- उच्च न्यायालय

आरे वृक्षतोडीविरोधात हरकतीचा पाऊस, पण वृक्ष प्राधिकरण म्हणते ३ हजारच हरकती



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा