Advertisement

पुरूषाला नपुंसक बोलाल, तर तुरूंगात जाल- हायकोर्ट

कुठल्याही पुरूषाला नपुंसक म्हणणं हा त्याचा अपमान करण्यासारखंच आहे, असं मत न्यायालयाने नोंदवलं. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर गुन्हाही दाखल होऊ शकतो.

पुरूषाला नपुंसक बोलाल, तर तुरूंगात जाल- हायकोर्ट
SHARES

पुरूषाला नपुंसक बोलणं म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखं आहे. एखाद्याने तसं केल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. प्रसंगी तुरूंगातही जावं लागू शकतं, अस मत मुंबई उच्च न्यायालयाने एका खटल्यात नोंदवलं आहे. त्यामुळे यापुढे कुणालाही नपुंसक म्हणून हिणावण्याआधी दहावेळा विचार करा.


कुठल्या प्रकरणात निर्णय?

आंध्र प्रदेशातील एका महिलेने आपल्या पतीविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला हाेता. तिचा पती नपुंसक असल्याचं त्या महिलेचं म्हणणं होतं. पत्नीचं हे म्हणणं पतीच्या जिव्हारी लागलं. त्यामुळे त्याने नागपूर मॅजिस्ट्रेट न्यायालयात पत्नीविरोधात खटला दाखला केला.


काय म्हटलं न्यायालय?

हा खटला रद्द करण्यासाठी पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात या खटल्याला आव्हान दिलं. मात्र या खटल्यावर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. सोबतच कुठल्याही पुरूषाला नपुंसक म्हणणं हा त्याचा अपमान करण्यासारखंच आहे, असं मत न्यायालयाने नोंदवलं. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर गुन्हाही दाखल होऊ शकतो.हेही वाचा-

मुंबईत ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांची संख्या शंभरावर

'अवनी'च्या चौकशी समितीवर निवृत्त न्यायधीश बसवा - उद्धव ठाकरेसंबंधित विषय
Advertisement