Advertisement

बोरिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

पश्चिम उपनगर पालिकेसाठी अद्यापही दोकेदुखी ठरत आहे. पश्चिम उपनगरामध्ये कोरोना रूग्ण सापडण्या संख्या अधिक आहे.

बोरिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
SHARES

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. परंतु पश्चिम उपनगर पालिकेसाठी अद्यापही दोकेदुखी ठरत आहे. पश्चिम उपनगरामध्ये कोरोना रूग्ण सापडण्या संख्या अधिक आहे. बोरिवलीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या सर्वाधिक आहे. या भागात सर्वात कमी दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. बोरिवलीमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ५७ दिवसात दुप्पट होत आहे.

पालिकेनं १९ ऑगस्टपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बोरिवलीमध्ये एकूण रुग्णांची संख्या ६ हजार ८९४ इतकी  आहे. बोरिवलीमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी दिवसात दुप्पट होत आहे. जी सध्या पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. परिसरातील कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी, पालिकेनं विविध ठिकाणी वैद्यकीय शिबिरांचं आयोजन केलं आहे. घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणीही केली जात आहे.

मुंबईत सध्या कोरोना रूग्णांची संख्या १ लाख ३२ हजार ८१७  आहे. त्यापैकी १ लाख ०७ हजार ०३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत ७ हजार ३११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.



हेही वाचा

ठाणे जिल्ह्यात कोरोनामुक्तीमध्ये उल्हासनगर, अंबरनाथ अव्वल

दिलासादायक! कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 'या' वॉर्ड्समध्ये १०० दिवसांवर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा