Advertisement

दादर चौपाटीवर तरुणाला सीडीआरएफच्या जवानांनी वाचवलं

दादर-माहिम चौपाटीवरील हिंदुजा रुग्णालयाजवळील सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास समुद्र चौपाटीवर फुटबॉल खेळत असलेल्या मुलांचा बॉल समुद्रात गेला. तो बॉल आणण्यासाठी समुद्रात गेलेल्या तरुणाला भरतीचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे लाटांनी तो आतील बाजुस ओढला जाऊ लागला.

दादर चौपाटीवर तरुणाला सीडीआरएफच्या जवानांनी वाचवलं
SHARES

मुंबई आपत्कालीन व्यवस्थापनाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सिटी डिझास्टर रिस्पॉन्स टीमनं आता जीवरक्षकाचीही भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी दादर-माहिम चौपाटीवर खेळताना समुद्रातून गेलेला फुटबॉल आणण्यासाठी गेलेला तरुण बुडत असताना त्याला या टिमच्या जवानांनी वाचवलं. प्रसंगावधान असलेल्या या टीममधील जवानांनी या तरुणाला सहिसलामत बाहेर काढलं.


लाटांनी अात ओढला गेला

दादर-माहिम चौपाटीवरील हिंदुजा रुग्णालयाजवळील सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास समुद्र चौपाटीवर फुटबॉल खेळत असलेल्या मुलांचा बॉल समुद्रात गेला. तो बॉल आणण्यासाठी समुद्रात गेलेल्या तरुणाला भरतीचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे लाटांनी तो आतील बाजुस ओढला जाऊ लागला. मात्र, त्याजवेळी तिथे गस्तीवर असलेल्या सीडीआरएफच्या जवानांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी त्वरीत समुद्राच्या पाण्याच्या दिशेनं धाव घेतली आणि बुडणाऱ्या या तरुणाला सुरक्षित बाहेर काढले.


पोलिसांच्या ताब्यात दिलं

वाचवण्यात आलेल्या या मुलाचं नाव ओमकार चव्हाण (१६) असून तो माहिम कोळीवाड्यातील राहणार असल्याचं समजतं. या मुलाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सीडीआरएफचे जवान प्रशांत जगताप यांनी दिली आहे. मनोज पाटील, गोपाळ सरदार, शिवनंदन फड, रामदास नागरजोगे या जवानांच्या मदतीनं या मुलाला वाचवण्यात आम्हाला यश आल्याचं त्यांनी सांगितलं.


अाधीही अशीच घटना

यापूर्वी १५ ऑगस्टला शिवाजीपार्क चौपाटीवर अशाच प्रकारे तीन लहान शाळकरी मुले समुद्राला मोठी भरती असतानाही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. भरतीच्या या पाण्याचा अंदाज न  आल्याने ही मुले बुडण्याची शक्यता होती. परंतु त्यावेळी सीडीआरएफ जवान अनिता हजारे व अनिता पालवे यांनी समुद्रात धाव घेऊन या तिन्ही मुलांना बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं.



हेही वाचा - 

मुदतवाढीनंतरही लाॅटरीकडे पाठ! ९०१८ घरांसाठी ६३९१३ इच्छुकांची नोंदणी

कमला मिल आग दुर्घटना: चौकशी समितीवर १८ लाखांचा खर्च




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा