Advertisement

मधमाशांच्या हल्ल्यात १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

ठाण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मधमाशांच्या हल्ल्यात १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
SHARES

ठाण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं होतं. दुर्दैवानं, मुलाचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरून मुलाच्या कुटुंबियांनी रुग्णालयावर नाराजी व्यक्त करत आरोप केले आहेत.

मुलाच्या कुटूंबियांनी रुग्णालय प्रशासनानं उपचारात निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप केला आहे. रागाच्या भरात मुलाच्या कुटुंबियांनी रुग्णालयात आरडाओरडा सुरू केला. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना बोलावण्या आलं.

घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला. तथापि, अद्याप यासंदर्भात कोणतीही अटक करण्यात आलेली नाही.



हेही वाचा

किसानकनेक्टच्या रोपांचे घरपोच वितरण

ठाण्यातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला भीषण आग

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा