Advertisement

मुंबई महापालिकेच्या मंडया १५ दिवस राहणार चकाचक


मुंबई महापालिकेच्या मंडया १५ दिवस राहणार चकाचक
SHARES

मुंबई महापालिकेच्या मंडयांमध्ये भाजीपाला तसेच इतर सामानांचा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन अस्वच्छता पसरली जाते. त्यामुळे कचऱ्यात बुडालेल्या आणि अस्वच्छतांचा आगार बनलेल्या मंडया आता पुढील तीन दिवस तरी चकाचक दिसणार आहेत. निमित्त आहे ते महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा या’ उपक्रमाचे.


स्वच्छतेचा पंधरवडा

मुंबई महानगरपालिकेच्याे वतीने ‘स्वच्छ्ता ही सेवा’ या मोहिमेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले मंडई येथे शुक्रवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. १५ सप्टेंबर ते दिनांक २ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत हा स्वच्छतेचा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.


लोकसहभागातून स्वच्छता

भाजी मंडई, बाजार या ठिकाणी दुकानदार व व्यापाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व ऐतिहासिक वारसास्थ‍ळे, जलस्रोत, जलसाठा, पर्यटन स्थळे या ठिकाणी लोक सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व कुटुंबांना व भाजी मंडई, बाजार संघटना, वाणिज्यिक क्षेत्रामध्ये सुक्या व ओल्या कचऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या रंगांच्या कचरा कुड्यांचे (Dustbins) वाटप करण्यासत येणार आहे.

उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेता यशवंत जाधव, विरोधी पक्षनेता रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, महापालिकेतील सर्व विविध पक्षीय गटनेते यांच्यासह ए, बी व ई प्रभाग समितीच्या अध्यक्षा गीता गवळी, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, उपायुक्त (विशेष) निधी चौधरी, सहायक आयुक्त संजय कुऱ्हाडे यासह सर्व नगरसेवक,नगरसेविका या समारंभास उपस्थित राहणार आहेत.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा