Advertisement

रेल्वे हेल्पलाइनवर प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस


रेल्वे हेल्पलाइनवर प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. अनेक सुविधा सुरू करूनही अद्याप प्रवाशांच्या वाटेला दु:ख येत असल्याचं चित्र आहे. याबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रार करूनही त्यावर उपाय निघत नसल्यामुळं प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. मागील वर्षभरात २१ हजारांहून अधिक प्रवाशांनी १५१२ या हेल्पलाईनवर संपर्क साधला आहे. त्यापैकी तब्बल ९४ टक्के कॉल हे तक्रार करण्यासाठी असल्याचे समोर आलं आहे.

आपत्कालीन परिस्थिती

मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत व अडचणींच्या वेळी तातडीनं मदत मिळावी, यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी घेतला. त्यानुसार १५१२ या क्रमांकाची टोल फ्री हेल्पलाइन ऑक्टोबर २०१७ रोजी सुरू करण्यात आली होती.

सर्वाधिक १९,७६८ कॉल

जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत एकूण २१ हजार ०७७ कॉल आले. यापैकी सर्वाधिक १९,७६८ कॉल हे तक्रारींचे आहेत. १,२५३ कॉल हे माहिती देण्यासाठी करण्यात आले होते, तर ५६ कॉल हे चौकशीसाठी आले आहेत. हेल्पलाइनवर आलेल्या कॉलपैकी तक्रारींच्या कॉलचं प्रमाण हे तब्बल ९३.७८ अर्थात सुमारे ९४ टक्के आहे.

अन्य प्रकाराच्या तक्रारी

तक्रारींच्या या कॉलमध्ये मोबाइलचोरी, बॅग विसरणं, लोकल विलंबानं असणं, स्थानकांवर अस्वच्छता या आणि अन्य प्रकाराच्या तक्रारींचा समावेश आहे. प्रवाशांकडून या तक्रारी प्राप्त झाल्यावर त्या सोडविण्यासाठी रेल्वे स्थानकांवरील 'ऑन ड्युटी' पोलिसांना योग्य त्या सूचना देण्यात येत आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्रकल्प रखडल्यानं त्याचा फटका सामान्य प्रवाशांना बसत आहे. पश्चिम रेल्वेवरील विविध कामं संथगतीनं होत असल्यानं पश्चिम रेल्वे प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे.



हेही वाचा -

मुंबई ते बदलापूर प्रवास होणार जलद

महापालिका शाळा दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा