Advertisement

क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना मालमत्ता करात सवलत

कोरोना काळात क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना मुंबई महापालिका प्रशासनाने मालमत्ता करात सवलत दिली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना मालमत्ता करात सवलत
SHARES
कोरोना काळात क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना मुंबई महापालिका प्रशासनाने मालमत्ता करात सवलत दिली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णालयांची जागा अपुरी पडत होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यासाठी महापालिकेने मुंबईतील अनेक हॉटेल ताब्यात घेतली होती. यामध्ये तारांकित आणि बिगर तारांकित अशी १८२ हॉटेल होती. त्याचे भाडे पालिकेने हॉटेल मालकांना दिले आहे. आता या हाॅटेल व्यावसायिकांना मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्याच्या कालावधीत या सर्व हॉटेलची मालमत्ता कराची रक्कम २२ कोटी ७० लाख रुपये आहे. 

  
बुधवारी हा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला असता, सभागृहनेत्या विशाखा राऊत व सर्व पक्षीय गटनेत्यांनी विरोध केला.  या प्रस्तावावर बोलण्याची संधीही देण्यात आली नाही, असा आरोप राजा यांनी केला.समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी लॉकडाउन कालावधीत पालिकेने एकप्रकारे हॉटेलचा भाड्याने वापर करून त्या हॉटेल मालकांना रोजगार दिला होता. त्याच हॉटेल व्यावसायिकांना मालमत्ता करात सवलत का द्यायची, असा सवाल उपस्थित केला. पालिकेने केवळ हॉटेल व्यावसायिकांना मालमत्ता करात सवलत न देता सर्वानाच सवलत देण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. अन्यथा कोणालाच अशी सवलत देऊ नये, अशी मागणी भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी केली.

हेही वाचा -

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह  Diwali 2020

दिवाळीत जादा भाडे आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कारवाई 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा