Advertisement

होम क्वारंटाईनच्या नावाखाली लाॅकडाऊनमध्ये शिपाई करत होता वसूली

होम क्वारंटाईन असताना पोलीस शिपायाने मित्राच्या मदतीने महामार्गावर वाहनचालकांची लूट केल्याचा प्रकार घडला आहे.

होम क्वारंटाईनच्या नावाखाली लाॅकडाऊनमध्ये शिपाई करत होता वसूली
SHARES

मुंबई पोलिस दलातील एका शिपायाच्या शेजारील व्यक्ती कोरोना बाधित झाल्यावर त्या माळ्यावरील सर्वच घरांना होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र एका शिपायाने परिस्थिची फायदा घेऊन नागरिकांना लुबाडण्याची नामी शक्कल लडवली. मात्र ती त्याच्या अंगलट आली. होम क्वारंटाईन असताना पोलीस शिपायाने मित्राच्या मदतीने महामार्गावर वाहनचालकांची लूट केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी पोलिस शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोघांवर कळवा पोलीस ठाण्यात फसवणूक व तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात होता. याप्रकरणी मुंबई पोलिस दलाचे बनावट ओळखपत्र आणि पोलिस गणवेशाचा वापर करण्यात होता.

हेही वाचाः- मुंबईत येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा

साकीनाका वाहतूक विभागात कार्यरत असलेला प्रसाद दत्ताराम महाडीक याच्या घरासमोरील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे महापालिकेने महाडीक राहत असलेली रहिवासी चाळ प्रतिबंधीत केली होती. त्यामुळे २२ जून ते ६ जुलै या कालवाधीत प्रसाद महाडिक याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. होम क्वारंटाईनच्या कालावधीत प्रसाद आणि त्याचा मित्र अमोल देवळेकर (४०) या दोघांनी मुंबई, ठाणे परिसरात लॉकडाऊनमध्ये वाहने घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून रक्कम उकळण्याचा बेत आखला होता. अमोलने स्वतःचे मुंबई पोलिस दलाचे बनावट ओळखपत्र तयार करून घेतले होते, तसेच पोलीस गणवेश देखील मिळवला होता. हे दोघे लॉकडाऊनमध्ये मुंबई, ठाणे येथील महामार्गावर उभे राहून वाहनांना थांबवून त्यांचे कागदपत्रे तपासत, त्यानंतर कागदपत्रात काहीतरी चुका काढून अथवा लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर पडल्याप्रकरणी कारवाई करण्याची भीती दाखवून वाहन चालकांकडून मोठी रक्कम उकळत होते.

हेही वाचाः- दारूची दुकानं उघडायला जेवढा उत्साह दाखवला, त्याच्या अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडायला दाखवा- देवेंद्र फडणवीस

४ जुलैला पहाटे तीनच्या सुमारास खारेगाव टोलनाक्यापुढे एका गाडी चालकाकडून आरोपींनी पाच हजार रुपये व जीएम दारूच्या बाटलीचा बॉक्स फसवून घेतला होता. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात फसवणूक व तोतयागिरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात महाडिकचा सहभाग निष्पन्न् झाल्यानंतर याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महाडिकला सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश वाहतुक विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा