Advertisement

स्वतंत्र्य दिनी ड्रग्जने भरलेला कंटेनर मुंबईत पकडला, तस्करीमागे हैद्राबाद कनेक्शन

मुंबई व हैद्राबादमध्ये राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत २५०किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यात २१० किलो मेफेड्रॉन, १० किलो केटामाईन व ३१ किलो एम्फिटामाईनचा समावेश आहे

स्वतंत्र्य दिनी ड्रग्जने भरलेला कंटेनर मुंबईत पकडला, तस्करीमागे हैद्राबाद कनेक्शन
SHARES

नवी मुंबईच्या न्हावाशेवा बंदरावर एक हजार कोटींचे हेरॉईन पकडल्याची घटना ताजी असतानाच, डीआरआयने मुंबईत ४७ कोटींचे ड्रग्ज आणि ४५ लाखांचे भारतीय व परदेशी चलन जप्त केले आहेत. या प्रकरणी डीआरआयने तीन जणांना अटक केली असून  अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचाः- दिग्दर्शक-अभिनेता निशिकांत कामत यांचं निधन

मुंबईत १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत असताना, डीआरआयचे अधिकारी देशातील तरुणांना ड्रग्जच्या आहारी ढकलणाऱ्या तस्करांचा माग काढत होते. या अधिकाऱ्यांना हैद्राबादवरून ड्रग्स भरलेला कंटेनर मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली होती. ड्रग्ज पकडले गेले तरी, कोणाला अटक होऊ नये, यासाठी का खासगी बसमध्ये कार्गो कंटेनरमध्ये ड्रग्स लपवण्यात आले होते. मात्र डीआरआयला गुप्त माहिती आधीच मिळाल्यामुळे त्यांनी बस सुटल्यावर कारवाई करून ड्रग्स पकडले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात हे ड्रग्स मुंबईत जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुंबई व हैद्राबादमध्ये राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत २५०किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यात २१० किलो मेफेड्रॉन, १० किलो केटामाईन व ३१ किलो एम्फिटामाईनचा समावेश आहे. त्याची किंमत ४७ कोटी रुपये आहे. याशिवाय ४५ लाख किमतीचे भारतीय चलन, अमेरिकन डॉलर व युरो जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचाः- मुंबईत मुसळधार पावसामुळं पाणी साचण्याची शक्यता

या संपूर्ण प्रकरणात आरोपींच्या मुस्क्या आवळताना, ही तस्करी हैद्राबाद मार्गे सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डीआरआयने मुंबईतील केमिकल लॅबोरेटरी व हैद्राबादमधील रासायनिक कारखान्यावर छापे टाकले. यावेळी डीआरआयने एका सराईत आरोपींसह तिघांना अटक केली. आरोपीने राहत्या घरातच प्रयोगशाळा उभी केली होती. मुख्य आरोपीला २०१७ मध्येही ड्रग्स तस्करीत अटक केली होती. हैद्राबादमध्ये ड्रग्स बनवून मुंबईत पाठवण्यात येणार होते. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मेफेड्रॉन हे रासायनिक ड्रग्स असून ते कोकेनसारखा नशा देते. म्यॅव म्यॅव म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. केटामाईन हे पार्टी ड्रग्स असून त्याला डेट रेप ड्रग्सही बोलतात. आरोपी रॅकेटची परदेशापर्यंत पुरवठा साखळी आहे. त्याचा सर्व व्यवहार हवाला मार्फत होतो

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा