Advertisement

बोरीवलीत 'इतक्या' दिवसात होताहेत कोरोना रुग्ण दुप्पट

मुंबईतील बोरिवली भागात कोरोना रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी होत आहे.

बोरीवलीत 'इतक्या' दिवसात होताहेत कोरोना रुग्ण दुप्पट
SHARES

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मंगळवारी मुंबईत कोरोना रूग्णांची एकूण संख्या ९५ हजार १०० च्या घरात गेली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेनं वॉर्डनुसार लॉकडाऊन लागू केला आहे. तरीही, मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.

मुंबई उपनगरामधील काही भाग अद्याप पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. बोरिवली, कांदिवली, मालाड आणि दहिसर भागात अजूनही कोरोना रूग्ण सापडत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतील बोरिवली भागात कोरोना रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी होत आहे.


हेही वाचा : शंभरीतील आजोबांची कोरोनावर मात, रुग्णालयातच केला १०१ वा वाढदिवस साजरा


बोरिवलीमध्ये कोरोना रूग्णांची संख्या २८ दिवसांमध्ये दुप्पट होत आहे. कांदिवलीमध्ये ३४ दिवस, दहिसरमध्ये ३५ दिवस आणि मालाडमध्ये ४४ दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत आहेत. ६ जुलै रोजी बोरिवलीमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ३ हजार २६५ होती. तर १३ जुलै रोजी कोरोना रूग्णांची संख्या वाढून ३ हजार ८८९ झाली.

कांदिवलीत ६ जुलै रोजी कोरोना रूग्णांची संख्या ३ हजार ३३० आणि १३ जुलै रोजी कोरोना रूग्णांची संख्या ३ हजार ८४३ पर्यंत वाढली. ६ जुलै रोजी दहिसर भागात कोरोना रूग्णांची संख्या १ हजार ९३८ होती. तर १३ जुलै रोजी २ हजार २२६ पर्यंत पोहोचली. मालाडमध्ये जुलै महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या ५ हजार २४२ होती. तर १३ जुलै रोजी कोरोना रूग्णांची संख्या ५ हजार ८५४ वर पोहोचली.



हेही वाचा

धारावी कोरोनामुक्तीकडे, अवघे 'इतके' आहेत अ‍ॅक्टिव रुग्ण

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी १०५ नवे कोरोना रुग्ण, तर ८ जणांचा मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा