Advertisement

कांदिवलीत कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ, मुंबईत दुसऱ्या स्थानावर

कोरोना रुग्ण सापडण्यामध्ये कांदिवली दुसऱ्या स्थानावर आहे.

कांदिवलीत कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ, मुंबईत दुसऱ्या स्थानावर
SHARES

मुंबईत कोरोना रूग्णांचा आकडा आता नियंत्रणात आहे. धारावीसारख्या परिसरात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यास पालिकेला यश आलं आहे. परंतु पश्चिम उपनगरातील बोरिवली आणि कांदिवली हे परिसर महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. एकीकडे बोरिवलीमध्ये, जिथे कोरोना रुग्ण सर्वाधिक सापडत आहेत. तर दुसरीकडे बोरिवलीनंतर कोरोना रुग्णांच्या आकडा वाढण्यात कांदिवलीचा नंबर लागतो.

कोरोना रुग्णांच्या वाढीच्या बाबतीत कांदिवली आता बोरिवलीच्या मागे आहे. पालिकेनं २० ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या ७ दिवसांत बोरिवलीतील कोरोना रूग्ण सापडण्याची सरासरी १.३७ टक्के आहे. तर कांदिवलीची सरासरी १.०८ आहे. मुंबईत सध्या बोरिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुपटीनं वाढत असून त्यानंतर कांदिवली दुसऱ्या स्थानावर आहे.

मुंबईची एकूण सरासरी सध्या ०.७८ टक्के आहे. २१ ऑगस्टपर्यंत मुंबईतील कोरोनाचे एकूण रुग्ण १ लाख ३४ हजार २२३ इतके आहेत. त्यापैकी १ लाख ०८ हजार २६८ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत.



हेही वाचा

कल्याण डोंबिवलीमध्ये ४२४ नवे कोरोना रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३३२ रुग्ण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा