Advertisement

शुक्रवारपासून बेस्टकडून स्थलांतरितांना प्रवास मोफत

सर्वोच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला या मजूरांना वाहतूक सुविधा मोफत देण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारपासून बेस्टकडून स्थलांतरितांना प्रवास मोफत
SHARES

लॉकडाऊनमुळं मुंबईतील विविध भागात अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे प्रशासनानं त्यांच्या मुळगावी परत पाठविण्यसाठी रेल्वेची व्यवस्था केली आहे. मजुरांना संबंधित रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे पोलिसांच्या मागणीनुसार बस गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. त्यांना तिकीट भाडे बेस्ट उपक्रमाच्या नियमित बस मार्गानुसारच प्रवासाच्या अंतरानुसार आकारण्यात येत होते. त्यामुळं या मजूरांची गैर सोय होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला या मजूरांना वाहतूक सुविधा मोफत देण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी दिलेल्या आदेशानुसार, शुक्रवारपासून मजुरांचा रेल्वेस्थानकापर्यंतचा प्रवास विनाशुल्क करण्यात आला असल्याची माहिती बेस्टच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. बेस्ट कंडक्टर संबंधित मजूर जमतात त्याठिकाणी बेस्टमधून प्रवास करण्यापूर्वी बेस्ट भाडे जमा करत होते. मात्र आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार असून कोणतेही भाडे आकारण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले.

बेस्ट प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सुविधा दिली जात आहे. परंतु, अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.



हेही वाचा -

राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा