Advertisement

मुंबईतील सर्वाधिक मृत्यू ५० ते ७० वयोगटातील

मृतांमध्ये ५० ते ७० वयोगटातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

मुंबईतील सर्वाधिक मृत्यू ५० ते ७० वयोगटातील
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ५० हजाराचा टप्पा पार केला आहे. रुग्णांच्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे. मुंबईतील मृत्यूचा दर ३.३ टक्के असला तरी एकूण बाधितांचा आकडा वाढल्यामुळं दरदिवशी होणारे मृत्यूही वाढत आहेत. या मृतांमध्ये ५० ते ७० वयोगटातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ८ जूनपर्यंत मुंबईत १७०० करोनाबळींची नोंद झाली. त्यापैकी ९९९ मृत्यू ५० ते ७० वयोगटातील आहेत.

मागील ८ दिवसांपासून दर दिवशी ५० च्या वर रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येच्या दुपटीचा वेग कमी झाला असून, मृत्यूदर ३.३ टक्केच कायम आहे. मुंबईत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांच्यापुढे गेली आहे. त्यापैकी २२,९४२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २६,१७८ रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

कोरोनाबाधितांमध्येही ३० ते ६० वयोगटातील रुग्णांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारा हा वयोगट आहे. कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांचं प्रमाण ६० टक्के असून, महिलांचं प्रमाण ४० टक्के आहे. एकूण मृतांमध्ये ५० ते ७० वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे.

कोरोनाबाधित आणि मृत्यूची संख्या

वय वर्षे
कोरोनाग्रस्त 
मृत्यू
० ते १०
८८५
१० ते २०
१६५७
२० ते ३०
७७१८
२४
३० ते ४०
९१७८
८३
४० ते ५०
९२६६
२७४
५० ते ६०
९७८२
५०४
६० ते ७०
६५०८
४९५
७० ते ८०
२९४१
२३३
८० ते ९०
८९७
६९
९० ते १००
१०९
११


मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी मोठी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९७ रुग्ण दगावले आहेत. तर ९ जून रोजी ६१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ८ जून रोजी रोजी एकूण ५३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे १५६७ नवीन रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५२ हजार ४४५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  कोरोनाचे ७५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण २३ हजार ६९३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा -

Coronavirus Pandemic: मुंबईत १५६७ नवे रुग्ण, दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू

महापालिकेनं सर्वाधिक ७९० इमारती केल्या सील



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा