Advertisement

मुंबईत केशरी रेशन कार्डधारकांना २४ एप्रिलपासून गहू, तांदूळ वाटप

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (APL) रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असं ५ किलो धान्य रेशन दुकानांमधून (ration shop) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबईत केशरी रेशन कार्डधारकांना २४ एप्रिलपासून गहू, तांदूळ वाटप
SHARES

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (APL) रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असं ५ किलो धान्य रेशन दुकानांमधून (ration shop) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्याचं वाटप १ मे ऐवजी आता २४ एप्रिलपासून मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) रेशन दुकानांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (food and civil supply state minister vishwajit kadam) यांनी दिली.

प्रत्येक व्यक्तीला मिळेल ‘इतकं’ धान्य

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (APL) कार्ड धारकांना (saffron ration card holder) शिधावाटप दुकानांमधून धान्य देण्यात येत नव्हतं. मात्र, लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी  ५९ हजार ते १ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी रेशन कार्डधारकांना १२ रुपये प्रति किलोने प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ व ८ रुपये किलोने ३ किलो गहू (wheat and rice) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेचा मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे ५७ लाख २० हजार लाभार्थींना लाभ होणार आहे.

हेही वाचा - Coronavirus Update: कोरोना नमुन्यांसाठी मुंबईत १०० फोटो बूथ बसवणार

‘या’ वेळेत मिळणार धान्य

या धान्याचे वाटप यापूर्वी १ मे रोजी सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, आता येत्या २४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत महानगर प्रदेशातील नागरिकांना रेशन दुकानांमधून हे धान्य वाटप होणार आहे. त्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून रेशन दुकानदारांना धान्य वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. कदम यांनी दिली.

तांदूळवाटप सुरू

तसंच अंत्योदय योजनेतील पिवळं रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आलं आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रेशन दुकानांमधून एप्रिल महिन्यात २७ हजार ७८४ मेट्रिक टन तांदळाचं १२ लाख ५ हजार ४२५ शिधापत्रिकाधारकांना मोफत वाटप करण्यात आलं आहे. उर्वरित १० हजार ५९३ मे.टन तांदळाचे वाटप लवकरात लवकर करण्याचे निर्देश डॉ. कदम यांनी दिले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी तसंच अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठीच्या एप्रिल महिन्यातील अन्नधान्याची शंभर टक्के उचल करण्यात आली आहे. या दोन्ही योजनेतून एप्रिल महिन्यात १३ हजार ८३७ मेट्रिक टन तांदूळ व २० हजार १५५ मेट्रिक टन गव्हाचं १६ लाख ९५ हजार १५९ शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यात आलं आहे.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा