Advertisement

राणीबाग लवकरच पर्यटकांसाठी होणार खुली


राणीबाग लवकरच पर्यटकांसाठी होणार खुली
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन लागु करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं मुंबईतील अनेक व्यवसाय, धंदे, पर्यटन स्थळं यांना टाळा मरण्यात आला. मागील ३ महीने अशीच परिस्थिती राज्यभरात होती. परंतु, लॉकडाऊनच्या ५व्या टप्प्यात राज्य सरकारने शिथिलता आणत अनेकांना दिलासा दिला. राज्यात 'मिशन बिगिन अगेन' सुरु करण्यात आलं. त्यानंतर महापालिकेनेही लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यास सुरुवात केली असून, पार्श्वभूमीवर आता भायखळा येथील राणीबाग पुन्हा खुले करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबईकरांसह देश-विदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी राणीबागेला भेट देत असतात. दररोज ५० टक्के पर्यटक प्रवेश, सामाजिक वावराचे पालन आणि आवश्यक खबरदारीच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला असून, सरकारनं परवानगी दिल्यास राणीबाग पर्यटकांसाठी खुलं केलं जाणार आहे. 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत उद्यान सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राणीबाग सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

  • गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
  • सामाजिक वावराचे नियम पाळले जातील.
  • प्राण्यांपासून अंतर ठेवण्यासाठी प्रेक्षक गॅलरीपासून एक मीटर अंतर ठेवले जाईल. 
  • तिकीट खिडकीजवळही सुरक्षित अंतर ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. 
  • दर दोन तासांनी सॅनिटायझेशन करण्यात येईल.

पेंग्विनच्या अगमनामुळं राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. राणीच्या बागेत दररोज सुमारे ५ हजार, तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी १० ते १५ हजारांपर्यंत पर्यटक येतात. याआधी दररोज १५ ते २० हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न १ लाखांपासून ६ लाखांपर्यंत वाढले आहे. मात्र, या लॉकडाउनमुळं राणीबाग पर्यटकांसाठी बंद असल्यानं दररोज दीड लाखांचा महसूल बुडत आहे.



हेही वाचा -

Jio 5G: पुढच्या वर्षी येणार जिओचं ५ जी नेटवर्क- मुकेश अंबानी

‘या’ परिसरात साचलं पाणी, पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ते केले बंद



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा