Advertisement

मीरा भाईंदरमध्ये लॉकडाऊन अंशत: शिथील, 'ही' दुकानं राहतील खुली

पालिका अधिकाऱ्यांनी मीरा भाईंदर मधल्या काही भागात लॉकडाऊन क्षिथील केलं आहे.

मीरा भाईंदरमध्ये लॉकडाऊन अंशत: शिथील, 'ही' दुकानं राहतील खुली
SHARES

मुंबईत कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मीरा-भाईंदरचा परिसर या वाढत्या कारणामुळे बंद आहे. तथापि, पालिका अधिकाऱ्यांनी काही भागात लॉकडाऊन क्षिथील केलं आहे. त्यानुसार शनिवार, ९ मे २०२० पासून शहरातील या भागातील हार्डवेअर, ऑप्टिशियन आणि इलेक्ट्रॉनिक दुकानं खोलण्याची परवानगी देण्यात आली होती.

२० एप्रिल २०२० पासून मीरा-भाईंदरमध्ये कडक बंद पाळण्यात आला होता. पालिका अधिकाऱ्यांनी फक्त अत्यावश्यक सेवा चालवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता काही सेवांना सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

  • हार्डवेअर, ऑप्टिशियन आणि इलेक्ट्रॉनिक शॉप्स, गॅरेज सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत खुले राहतील.
  • सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत वैद्यकीय दुकाने खुली असतील
  • दूध आणि काही दुग्धजन्य पदार्थ निवडलेल्या स्टोअरमध्ये सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत उपलब्ध असतील
  • सर्व किराणा दुकानं आणि विभागीय स्टोअर सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत खुली राहतील
  • सकाळी ९ ते ११ या दरम्यान फक्त मांस, फळे आणि भाज्यांची होम डिलीव्हरी करण्यास परवानगी आहे. या वस्तूंची विक्री करणारी दुकानं १२ मेपर्यंत बंद राहतील.

मीरा-भाईंदरचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मिरर ऑनलाईनला सांगितलं की, नागरिकांची सोय लक्षात घेऊन निर्बंध कमी करण्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीच्या कामास परवानगी देण्यात आली आहे.

८ मे २०२० पर्यंत या भागातून १९२ रुग्ण आढळले आणि दोन जणांचा मत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील एकूण प्रकरणांची संख्या १२ हजाराच्या वर गेली आहे. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भांव रोखण्यासाठी पालिका सर्व प्रयत्न करत आहे.



हेही वाचा

मुंबई पालिकेत आता ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक

लवकरच मुंबईहूनही सुटणार विशेष रेल्वे, मुख्यमंत्र्यांचे संकेत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा