Advertisement

महाराष्ट्रातील लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत

राज्यातील कोरोना भीषण रुप घेत असल्याने महाराष्ट्रातील लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरूवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच उपस्थित नेत्यांना तसे संकेत दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

महाराष्ट्रातील लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत
SHARES

राज्यातील कोरोना भीषण रुप घेत असल्याने महाराष्ट्रातील लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरूवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच उपस्थित नेत्यांना तसे संकेत दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान,  शुक्रवार ८ मे रोजी रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. यामुळे मुख्यमंत्री काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

कुणाचा सहभाग?

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मंत्रालयात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर, जयंत पाटील, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई हे नेते उपस्थित होते. तर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील बैठकीत सहभागी झाले होते. 

हेही वाचा - हीच 'ती' योग्य वेळ, परप्रांतीयांबद्दल राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना सूचना

यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या योजनेत काही त्रुटी आहेत का? आणखी कुठल्या उपाययोजना करता येतील? याविषयी उपस्थित नेत्यांना विचारणा केली तसंच त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. 

नेत्यांच्या सूचना

या बैठकीत कटेंन्मेंट झोनमध्ये प्रत्येकाची तपासणी व्हावी, कोरोना हाॅटस्पाॅट असलेल्या शहरात रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांवर नियंत्रण मिळवावं, लॉकडाऊनच्या काळातही अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, आरोग्य कर्मचारी, पोलिसांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे, त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावं तसंच परप्रांतीयांना आपापल्या गावी जाण्यासाठी त्यांच्या संख्येनुसार योग्य ती व्यवस्था करावी, अशा प्रकारच्या सूचना सर्वपक्षीय नेत्यांनी केल्या. 

३१ मे महत्त्वाचा

महत्त्वाचं म्हणजे या बैठकीत उपस्थित बहुतेक सर्वच नेत्यांनी महाराष्ट्रातील लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात यावं, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. याकडे पाहता मुख्यमंत्र्यांकडून लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याआधी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसोबत घेतलेल्या बैठकीत काहीही करून महाराष्ट्र ३१ मेपर्यंत ग्रीन झोनमध्ये आला पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला याआधी दिले होते. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा